HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

राज्यात दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट

मुंबई | राज्यातील दररोज वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या अनेक दिवसांपासून घटत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१९ ऑक्टोबर) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, “गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार ९८४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिलासादायक म्हणजे राज्यात आज तब्बल एकाच दिवसात १५ हजार ६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. नव्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत राज्यात एकूण तब्बल १३ लाख ८४ हजार ८७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण १ लाख ७३ हजार ७५९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८६.४८% इतके झाले आहे. दरम्यान, राज्यात दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट झाल्याने राज्यातील टेस्टिंगचेही प्रमाण घटले आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतो.

Related posts

नववारी साडी नेसून पार केली 42 किलोमीटरची स्पर्धा

News Desk

मुख्यमंत्र्यांचे अपघातग्रस्त हेलीकाॅप्टर चाैकशी समितीने मध्यरात्री मुंबईकडे रवाना

News Desk

८ जुलैपासून राज्यात कंटेन्मेंट झोन वगळता हॉटेल-लॉज सुरू

News Desk