HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

दिवस मावळल्यानंतरही लाईट लावून फडणवीसांचा पाहणी दौरा सुरूच

उस्मानाबाद | राज्यातील परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे, राज्यातील अनेक मोठे नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राज्यभर पाहणी दौरे करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आजपासून (१९ ऑक्टोबर) बारामतीहुन आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. विशेष म्हणजे दिवस मावळल्यानंतरही फडणवीस यांचा हा पाहणी दौरा सुरूच होता. फडणवीसांनी संध्याकाळी ७.३० च्या दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील रोसा गावात पिकांची पाहणी केली. विषेश म्हणजे अंधार असल्याने लाईट लावून पाहणी करून यावेळी फडणवीसांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना यावेळी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. “परतीच्या पावसाने आमचे होत्याचे नव्हते केले. आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. सरकारने आता तरी आम्हाला मदत करावी पूर्ण शेती वाहून गेल्याने आता जर मदत मिळाली नाही तर आत्महत्या केल्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय उरणार नाही”, असे इथल्या हवालदिल शेतकऱ्यांनी फडणवीसांना सांगितले आहे. तर, “तुमच्यावर अशी वेळ येऊ देणार नाही”, असे आश्वासन फडणवीसांनी येथील शेतकऱ्यांना दिले आहे.

“तुम्ही काळजी करु नका. आम्ही तुम्हाला राज्य सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ. आम्ही सरकारशी भांडून तुम्हाला मदत मिळवून देऊ. वेळ कठीण असली तरीही तुम्ही जिद्द सोडू नका”, असे आश्वासन यावेळी फडणवीस यांनी येथील शेतकऱ्यांना दिले आहे. दरम्यान, परतीच्या पावसामुळे राज्यात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली असून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. याबाबत सरकार नेमका काय निर्णय घेणार ? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

Related posts

राज्यातील घाणेरड्या राजकारणामुळे मला राजीनामा द्यावा लागला ,संजय राठोडांची खंत!

News Desk

स्वबळावर निवडणुका लढवण्याची आमची भूमिका योग्यच! काँग्रेसचा पुनरुच्चार

News Desk

कोरोना संकटातही राज्याची आर्थिक प्रगती समाधानकारक! – नाना पटोले

News Desk