HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अखेर बेड्या

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाने राज्याचं राजकारण ढवळून निघालं. कारण, या मृत्यू प्रकरणाशी राजकीय वर्तुळातील एक नाव जोडलं गेलं ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंना व्हॉट्सअॅपवर मेसेज करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही एक धक्कादायक प्रकार घडला होता. परंतु, आता अखेर या धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई क्राइम ब्रँचच्या सायबर सेलने अटक केली. जयसिंह राजपूत असं या आरोपीचं नाव असून तो स्वतःला दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा चाहता म्हणवून घेत आहे.

मंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी जयसिंह राजपूत ३४ वर्षीय असून त्याला बेंगळुरूतून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ८ डिसेंबर रोजी जयसिंह राजपुटने आदित्य ठाकरेंना व्हॉट्सअॅपवर ही जीवे मारण्याची धमकी दिली होती. यावेळी त्याने अपशब्दही वापरले होते. आदित्य ठाकरेंना अनेक फोन्सही करण्यात आले. त्याचसोबत, त्याने आदित्य ठाकरे हेच अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा दावा केला होता. दरम्यान, या प्रकारानंतर आदित्य ठाकरेंनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता अखेर या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यशवंत जाधवांच्या डायरीतल्या ‘मातोश्री’ उल्लेखावर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण

News Desk

महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा, संभाजीराजे पुढाकार घ्या, प्रकाश आंबेडकरांनी थोपटली पाठ!

News Desk

‘त्या’ वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांचा घुमजाव

News Desk