HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला अपघात

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या पायलट जीपला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाच्या खाली अपघात झाला आहे. या अपघातात पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. पुण्याहून मुंबईला जाताना आज (२९ जून) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली.

मुंबई-पुणे द्रुतगतीवर अपघात झाल्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे वाहनाची कोंडी झाली होती. अपघात झाला त्यावेळी शरद पवारांची गाडी पुढे होती. त्यामुळे त्यांच्या गाडीला धक्का न लागल्याने सुरक्षित आहे. स्थानिक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करुन पवारांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना केला.

Related posts

राज्यात आज ४,८७८ कोरोना रुग्णांची नोंद, तर २४५ जणांचा मृत्यू

News Desk

कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी ‘रॅपिड टेस्ट’ला केंद्राकडून मान्यता, आरोग्यमंत्र्यांची माहिती

News Desk

मोदी सरकारची कामगिरी आता पुस्तकात

News Desk