HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

पूरग्रस्तांसाठी राज्याचा केंद्राकडे ६००० कोटींच्या मदतीचा प्रस्ताव

मुंबई | राज्यात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांसाठी राज्य सरकार ६००० कोटी रुपयांची मदत करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार आहे. आज (१३ ऑगस्ट) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली. त्याचप्रमाणे, मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आपला एका महिन्याचा पगार पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार असल्याचे देखील यावेळी जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, केंद्राकडे मदतीसाठी पाठविण्यात आलेला प्रस्ताव हा आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारावर पाठविण्यात आलेला आहे.

राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावाचे २ भाग असणार आहेत. “१ ते ९ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अभूतपूर्व आणि आतापर्यंतचा सर्वाधिक दुप्पट किंवा तिप्पट पाऊस झाला आहे. आम्ही आम्हाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार केंद्र सरकारला मदतीचा प्रस्ताव पाठवत आहोत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन प्रस्ताव पाठवला जाईल”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Related posts

राज्यभरात मुसळधार!

News Desk

…तर १ ऑगस्टला होणार जेल भरो आंदोलन

News Desk

अन् शरद पवार म्हणतात, अभी तो मै जवान हूं !

News Desk