HW News Marathi
महाराष्ट्र

“पडळकर हा एक मनोरुग्ण,” शिवसेनेचा पडळकरांवर थेट वार  

सांगली । भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ह्यांच्यातल्या वादाने आता एक वेगळाच वळण घेतलं आहे. ३० जूनला गोपीचंद पडळकर यांनी काल पत्रकार परिषदेत शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकासआघाडीवर खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यांच्या या वादग्रस्त टीकेमुळे नाराजी असतानाच काल संध्याकाळी पडळकर यांच्या गादीवर दगडफेक करून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात कोणालाही इजा झाली नाही.

गोपीचंद पडळकर हा एक मनोरुग्ण

शिवसेनेने पडळकरांच्या वादात आपला वक्तव्य केला आहे. शिवसेना जिलाध्यक्ष संजय विभुते म्हणाले कि, “पडळकर हे एक मनोरुग्ण आहे. तो काहीही बोलत फिरत असतो आणि प्रसिद्धीसाठी हपापलेला असतो. पडळकर हा भाजपाला मातीत मिळवल्याशिवाय राहणार नाही. महाविकासआघाडीमधील एकही नेता त्याला गांभीर्याने घेत नाही,”, असं विभुते यांनी म्हटलं आहे. यावर आता पुन्हा पडळकर काय बोलणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

पडळकरांच्या गाडीवर झालेल्या हल्या प्रकरणात दोन आरोपींवर गुन्हा दाखल

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्या प्रकरणात दोन अज्ञात आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांच्या महितीनुसार या दोन्ही आरोपींची ओळख पटली असून पोलीस पथकामार्फत त्यांचे शोध कार्य सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्याने गाडीवर दगडफेक केली त्या तरुणांचे अमित सुरवसे आहे. अमित हा 25 वर्षीय असून त्याचे शिक्षण बीए पर्यंत पूर्ण झालेले आहे. सोलापुरातील एका शाळेत अमित हा लॅब असिस्टंट म्हणून काम करतो. अमित हा स्वतः धनगर समाजातून असून समाजातील विविध प्रश्नांवर त्याने या आधी आवाज उचलला असल्याची माहिती आहे. मागील वर्षी याच सरकारच्या विरोधात अमित याने मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन केल्याची माहिती देखील पुढे येत आहे. मात्र गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला करण्यामागे नेमके काय कारण असेल हे अटकेनंतर समजेल. राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांसोबत अमित याचे फोटो सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. मात्र त्याच्याकडे राष्ट्रवादीचे कोणतेही पद नसल्याचे देखील कळते आहे.

‘पडळकरांच्या गाडीवर हल्ला हा भाजपने घडवून आणलेला स्टंट’

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं, जी घटना झाली ही कुठल्याही सन्माननीय सदस्याच्या गाडीवर होऊ नये, मात्र, हा भारतीय जनता पक्षाकडून घडवून आणलेला स्टंट आहे. अशा प्रकारचा स्टंट घडवून आणायचा आणि स्वत: प्रकाश झोतात यायचं. मग, सुरक्षेची मागणी करायची. शरद पवारांवर ज्या पातळीवर टीका करण्यात आली ती भाषा हलकटपणाची म्हणता येते. हलकटपणाची भाषा करुन टीका करणाऱ्यांनी पब्लिसिटी करणाऱ्या भाजपने शहानपणा शिकवू नये.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठीतील दिग्गज कलाकारांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश 

News Desk

बुलडाणा अर्बनच्या कोथळी शाखेत 1 कोटी 37 लक्ष रुपयांचा अपहार

News Desk

सावधान…दुकानांमध्ये प्लस्टिक पिशवी सापडल्यास परवाना रद्द

News Desk