मुंबई | कोरोनाविरूद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला मुंबईतील नामवंत आणि तज्ञ डॉक्टर्स यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला असून मुख्य सचिवांच्या पातळीवर या डॉक्टर्सचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे डॉक्टर राज्यभरातील कोरोना उपचार करणाऱ्या डॉक्टर्सना हॉट लाईनच्या माध्यमातूनही उपलब्ध असतील. सोमवारी ( एप्रिल १३) या डॉक्टर्सशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला व टास्क फोर्सने करावयाच्या कामांबाबत सूचना ऐकून त्याप्रमाणे कार्यवाहीचे प्रशासनाला निर्देश दिले. राज्यातला वाढता मृत्यू दर चिंतेचा विषय असून तो कमी करणे नव्हे तर एकही व्यक्ती मरण पावली नाही पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
A Task Force of Specialist Doctors to suggest measures to minimise the death rate, for clinical management & treatment of critically ill COVID-19 patients particularly in specialised designated Hospitals has been constituted by the State Government.#WarAgainstVirus pic.twitter.com/QYrDrkQGUq
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 13, 2020
ही टीम एकीकडे राज्य शासनाला वैद्यकीय उपचारांबाबत सुयोग्य मार्गदर्शनही करतील तसेच राज्यभरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आळीपाळीने हॉट लाईनवर सहाय्य करतील डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करणे, या रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्था, प्रत्येक रुग्णाला तो कोविडग्रस्त समजून उपचार सुरू करणे, चांगल्या सुसज्ज रुग्णवाहिका, कोविड आयसीयूमधील उपचार पद्धती यावर व अनुषंगिक उपचारांवर ही टीम देखरेखही ठेवेल तसेच सल्ला देईल. प्रारंभी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी माहिती दिली व कोरोनविषयक आढावा घेतला.
टास्क फोर्समध्ये खालील डॉक्टर्स नावे
- डॉ.संजय ओक, डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू
- डॉ. झहीर उडवाडिया, हिंदुजा रुग्णालय.
- डॉ . नागांवकर, लिलावती रुग्णालय .
- डॉ . केदार तोरस्कर , वोक्हार्ट रुग्णालय .
- डॉ . राहुल पंडित, फोर्टीस रुग्णालय .
- डॉ . एन.डी. कर्णिक, लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव .
- डॉ . झहिर विरानी , पी . ए .के. रुग्णालय .
- डॉ . प्रविण बांगर, केईएम रुग्णालय .
- डॉ . ओम श्रीवास्तव, कस्तुरबा रुग्णालय .
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.