‘मुंबई। भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आता जोरदार टीका केलीय. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पडळकरांवर निशाणा साधलाय. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांनीही पडळकर यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. मात्र, त्यावरुनच सक्षणा सलगर यांना धमकीचा फोन आल्याचं ट्वीट केलंय. या ट्वीटमध्ये सक्षणा यांनी एक मोबाईल नंबरही दिलाय. सक्षणा यांच्या ट्वीटवरुन आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. तसंच याबाबत आपण सक्षणा सलगर यांच्या पाठीशी असल्याचं ट्विट करत म्हटलये.
मला आज सायंकाळी 06:14 वा.
99 223 000 38 या नंबरवरून फोनवरून कॉल आला होता .ही व्यक्ती माझी इज्जत लुटण्याची भाषा करत होती. आ.गोपीचंद पडळकर यांचा तो कार्यकर्ता आहे असे तो सांगत होता.@CMOMaharashtra @OsmanabadPolice @Jayant_R_Patil @supriya_sule @DGPMaharashtra— Sakshna Salgar (@SakshnaSalgar) July 3, 2021
मला आज सायंकाळी ०६:१४ वा. ९९ २२३०००३८ या नंबरवरून फोनवरून कॉल आला होता. ही व्यक्ती माझी इज्जत लुटण्याची भाषा करत होती. आ. गोपीचंद पडळकर यांचा तो कार्यकर्ता आहे असे तो सांगत होता’, असं ट्वीट सक्षणा सलगर यांनी केलं आहे. त्यात त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याने आपल्याला धमकी दिल्याचा आरोप सक्षणा यांनी केलाय.
चित्रा वाघ राष्ट्रवादीच्या महिलेच्या पाठीशी-
सक्षणा सलगर यांनी केलेल्या ट्वीटनंतर चित्रा वाघ यांनी आपण सक्षणा यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय. “सक्षणा, तो कोणीही असो त्याला शिक्षा ही व्हायलाचं हवी. पोलिसात लेखी तक्रार ही कर मी तुझ्या सोबत आहे. अशा पद्धतीत कुणीही महिला/मुलीला धमकावू शकत नाही आणि जो हे करेल त्याला आम्ही सोडणार नाही. हा राजकीय नाही तर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यासाठी एकत्रित येऊन विकृतांना ठेचू”, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सक्षणा यांना पाठिंबा दिला आहे.
सक्षणा
तो कोणीही असो त्याला शिक्षा ही व्हायलाचं हवी
पोलिसात लेखी तक्रार ही कर मी तुझ्या सोबत आहे
अशा पद्धतीत कुणीही महिला/मुलीला धमकावू शकत नाही आणि जो हे करेल त्याला आम्ही सोडणार नाही
हा राजकीय नाही तर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यासाठी एकत्रित येऊन विकृतांना ठेचू https://t.co/VCvPFeS9xc— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 4, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.