HW News Marathi
महाराष्ट्र

ED कडून नवाब मलिकांची मालमत्ता जप्त, रहत्या घरावर देखील टाच

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांच्या एकूण ८ मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. मलिकांच्या कुर्ला पश्चिममेतील एक व्यवसायिक जागा, कुर्ल्यातील गोवावाला कंम्पाऊंड जप्त, वांद्रे पश्चिममधील २ फ्लॅट्स, ठाण्यातील मालमत्ता आणि उस्मानाबादमधील १४८ एकरची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने जप्त केलेली मलिकांची मालमत्ता ही त्यांच्या नावावर आणि त्यांच्या कंटुंबियांच्या नावावर असल्याची माहिती मिळली आहे. 

 मलिकांना ईडीने दाऊद इब्राहिम मनी लॉन्डिग केल्याप्रकरणी अटक केली असून मलिक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. मलिकांनी दाऊतची बहिण हसिना पारकर यांच्याकडून मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप केला असून त्यांनी   मलिकांना ही जमीन ५५ लाखाला मिळाली होती. या जमिनीची सध्याची किंमत ३०० कोटीची असल्याची माहिती ईडीच्या तपासातून मिळाली आहे. यात गैरव्यवहारच्या पार्श्वभूमीवर ईडीने मलिकांना २३ फेब्रुवारी सकाळी त्यांच्या घरावर धाड टाकून चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेहण्यात आले होते. यानंतर पीएमएलए न्यायालयाने मलिकांना ईडीच्या कोठडीत सुनावली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘या’ आहेत मोठ्या घोषणा

Aprna

सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ५ जणांना अटक

News Desk

धार्मिक गुरु दादा वासवानी यांचे पुण्यात निधन

News Desk