HW News Marathi
महाराष्ट्र

बारामतीत भरदुपारी महिलेवर चाकू हल्ला

बारामती | टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या बुकिंग ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका महिलेवर चाकूहल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात घडला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून आरोपी या शोधासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत. यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा युवक काल (१७ जानेवारी) देखील टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या ऑफिस बाहेर रेंगाळताना दिसला होता.

आज (१८ जानेवारी) दुपारी त्याने ऑफिसमध्ये प्रवेश करीत काल देखील मी आलो होतो. पण, ऑफीस बंद होते असे म्हणत काम करत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या गळ्यात असलेल्या दागिन्यांकडे हात नेला या महिलेला प्रतिकार केला असता तिच्यावर चाकूहल्ला करत हा युवक पळून गेला. ऑफिसच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये या युवकाचे चित्रीकरण झाले असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान, या महिलेच्या करंगळीला दुखापत झाली आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. हा हल्ला कोणत्या कारणासाठी झाला याचा शोध मात्र अद्याप लागलेला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्यसरकार लवकरच दिलासा देईल -अजित पवार

News Desk

“इंटर्व्हलनंतरची स्टोरी मी सांगतो”, NCB प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा

News Desk

‘वंचित बहुजन आघाडी’च्या दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk