HW News Marathi
महाराष्ट्र

‘म्हणूनच मी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला, आदित्य शिरोडकरांनी सांगितलं कारण

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक मोठा धक्का बसला आहे. विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. आदित्य यांनी हा निर्णय का घेतला याची चर्चा कालपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य शिरोडकर यांनी स्वत:च आपली भूमिका मांडली आहे.

मनसे सोडायचं नेमकं कारण काय?

आदित्य शिरोडकर यांनी मनसे सोडून शिवसेना पक्षात प्रवेश घेतला आहे. शिरोडकरांनी आता याचं कारण स्पष्ट केलं आहे, ‘बाळा नांदगावकर यांच्याशी शाब्दिक चकमक हे एकच मनसे सोडण्याचं कारण नाही. त्या वादाला काही कारण होतं. पक्षातील तरुण पदाधिकारी काय करतात? विद्यार्थी सेना महाविद्यालये, विद्यापीठात नेमकं काय काम करते? याबाबत वरिष्ठ नेत्यांनी माहिती घेणं. मार्गदर्शन करणं अपेक्षित असतं. ते आमच्याकडं होत नव्हतं. आमच्या कामाची कुठलीही माहिती न घेता परस्पर मीडियाला जाऊन विद्यार्थी सेना काम करत नाही असं सांगणं हे योग्य नव्हतं. त्यातून आमची शाब्दिक चकमक झाली होती. पण, हे असे वाद होत असतात.

मागच्या अनेक वर्षांत असे अनेक प्रसंग आले. माझा निर्णय हा काही काल-परवा झालेला नाही. बाळा नांदगावकर यांच्यासोबत झालेला वाद समोर आला, पण सगळ्याच गोष्टी मला मीडियासमोर सांगता येणार नाहीत. प्रवीण दरेकर, वसंत गिते, शिशिर शिंदे मनसेतून गेली, त्यालाही काही कारणं होती, पण मला त्या खोलात जायचं नाही,’ असं आदित्य शिरोडकर यांनी सांगितलं आहे.

पक्षापासून काही लपून नव्हतं

‘माझ्या बाबतीत जे काही होत होतं, ते गुपित नव्हतं. ते पक्षाला दिसत होतं. हे चित्र बदलेल म्हणून मी वाट पाहिली आणि शेवटी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पूर्णपणे माझा होता. मी राज ठाकरेंशी चर्चा वगैरे केली नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि मनसेत जो एक वाद निर्माण झाला आहे त्याचं पुढे काय होणार हे येत्या काळातचं समजेल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेठ ग्रामपंचायत नूतन इमारतीच्या माध्यमातून गावाच्या विकासाला गती मिळेल! – अजित पवार

Aprna

‘आता गोकुळचा दबदबा मुंबईत वाढवणार ‘सतेज पाटलांचं ठरलयं!

News Desk

“भय इथले संपत नाही”, चित्रा वाघ यांचा सरकारवर निशाणा

News Desk