HW News Marathi
महाराष्ट्र

“पाहणीसाठी नाही तर मदतीसाठी आलोय”,आदित्य ठाकरेंचं चिपळूणकरांना आवाहन

चिपळूण | पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आज (२९ जुलै) चिपळूण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती घेतली. आदित्य यांनी चिपळूणमधील चिमुकल्यांशीही संवाद साधला. त्यावेळी बोलताना पूरग्रस्तांना पंचनामे झाल्यावर भरीव आर्थिक मदत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आहे. पूरग्रस्तांचं बचावकार्य संपलं आहे आता मदतकार्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मी पाहणी दौऱ्यावर नाही तर मदत करण्यासाठी आलो असल्याचं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

चिपळूण आणि महाड या दोन्ही तालुक्यात जात आहे. आता पाहणी नाही तर मदतीचं काम सुरु झालंय. पहिल्या दिवसांत आमचे आमदार, खासदार, जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी, एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेवाभावी संस्था आदींनी रेस्क्यूमध्ये खूप काम केलं आहे. आता मदतकार्याला सुरुवात झाली आहे. अजूनही काही जिल्ह्यात रेड अलर्ट आहे. पण आता पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झालीय. त्यामुळे शासनाकडून मदत सुरु करण्यात आली आहे. आम्ही शिवसेना म्हणून जी मदत करायची आहे ती करत आहोत. अन्य पक्षही मदत करत आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

‘पंचनामे पूर्ण झाल्यावर पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत’

ही वेळ पक्षीय राजकारण बाजूला ठेवायची आहे. महाराष्ट्रात ते चित्र पाहायला मिळत आहे. आपण सगळे मिळून लोकांसाठीच काही करत आहोत, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. पंचनामे पूर्ण झाल्यावर पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत दिली जाईल. मात्र, आता सुरुवातीच्या काळात आरोग्य तपासणी, घरगुती सामान, स्थलांतर आदी गोष्टी आम्ही करत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबरला होणार

News Desk

MPSC पूर्व परीक्षेची नवी तारीख उद्याच जाहीर होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

News Desk

“हो राज्यपालांच्या सल्ल्यानेच राज ठाकरेंनी मला फोन केला”, शरद पवारांचे स्पष्टीकरण

News Desk