HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंनी अचानक ट्विटर प्रोफाईलमध्ये का केला बदल?

मुंबई | आघाडी सरकारमधील पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या अनेक मुद्द्यांवरून चर्चेत आहेत. त्यातच आता आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलमध्ये बदल केला आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर प्रोफाइलवरुन ‘महाराष्ट सरकारमधील पर्यटन आणि पर्यावरण मंत्री’ हे शब्द काढून टाकले आहेत. आणि या बदलामुळे चर्चांना उधाण आले आहे.

आदित्य ठाकरे यांनी अचानक ट्विटर प्रोफाइलमध्ये बदल करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण यानिमित्ताने आदित्य ठाकरे सध्या कोणती नवी भूमिका घेणार की त्यांना नवीन जबाबदारी दिली जाणार आहे अशी चर्चा सुरु आहे. शिवसेना किंवा आदित्य ठाकरे यांनी याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही.

सुशांत सिंह प्रकरणी वारंवार आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं जात आहे. विरोधक थेटपणे आदित्य ठाकरेंचं नाव घेणं टाळत असले तरी अप्रत्यक्षपणे वारंवार त्यांच्याकडे बोट दाखवलं जात आहे. आदित्य ठाकरे यांनी जाहीरपणे आपला या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. सोबतच सुशांत सिंह प्रकरणी चौकशी सुरु असलेल्या रिया चक्रवर्तीनेही आपण आदित्य ठाकरेंना ओळखत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी केलेला बदल कशामुळे आहे हा प्रश्न विचारला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृता फडणवीसांचे टिकाकरांना सडेतोड उत्तर…! म्हणाल्या…

News Desk

दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एसटीकडून मोफत पास

News Desk

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारवर कर्ज काढण्याची वेळ येणार?

News Desk