HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्ष परिक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आदित्य ठाकरे UGC च्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात…

दिल्ली| महाराष्ट्र सरकराने विद्यर्थ्यांच्या अंतिम वर्ष परिक्षा रद्द करण्याची मागणी वारंवार केली आहे,सरकरा परिक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे . मात्र  केंद्र सरकारच्या निर्णयानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा करोनाकाळातही घेतल्या जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात  आता महाराष्ट्रातील महाविकासआघाडी  सरकारने  सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.  UGC ने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाला आव्हान देत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या माध्यमातून  सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका दाखल केली आहे.  परंतु कोर्टाने अद्याप ही याचिका सुनावणीसाठी स्वीकारलेली नाही.

यूजीसीच्या परीक्षा व शैक्षणिक कॅलेंडरच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा न घेण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला आहे.

 

Related posts

सुशीलकुमार शिंदेंची उमेदवारी निश्चित, राहुल गांधी लवकरच सोलापूर दौऱ्यावर

News Desk

पंतप्रधान-राष्ट्रपतींची भेट, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय विषयांवर झाली चर्चा

News Desk

महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ, फडणवीसांची टीका

News Desk