HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

…यावरुन आदित्य ठाकरेंचा पुणेकरांना चिमटा

aaditya thackeray on pune afternoon life

मुंबई |मुंबईच्या नाइट लाइफच्या प्रस्तावाला अखेर आज राज्य मंत्रिमंडळाची संमती मिळाली आणि २७ जानेवारीपासून या प्रयोगाची अंमलबजावणीही होणार आहे. मंत्रीमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरेंनी ही माहिती दिली. नाइट लाइफ सुरु होत असली तर मुंबई पोलिसांवरील ताण वाढणार नाही, असा दावाही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुंबई पाठोपाठ आता पुण्यात नाईट लाईफ सुरू करण्याचा काही प्रस्ताव आहे का? या प्रश्नावर बोलताना , ‘पुण्यात आधी आफ्टरनून लाईफ सुरू करतोय’ असं उत्तर आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांना दिले.

पुणे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात  पुणेरी पाट्या आणि अपमान हे ठरलेलं समीकरण. पण पुण्यात इतक्याच गोष्टी नाही आहेत, पुणेकरांची ड्रायव्हींग स्टाईल, किंवा वामकुक्षी घेण्याची सवय सगळं काही एक चर्चेचाच विषय आहे. अस काही अंशी परिस्थिती बदलताना दिसत असली तरी पुणेकरांवर लागलेला हा शिक्का काही गेलेला नाही. ‘पुणे दुपारी १ ते ४ बंद’ या गोष्टीवरून अनेकदा पुणेकरांना ट्रोलही करण्यात येते आणि त्याचाच आधार घेऊन आदित्य ठाकरेंनी पुण्यात नाईट लाईफ ऐवजी आफ्टरनून लाईफ सुरू करत असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, २७ जानेवारीपासून मुंबईत ‘नाईट लाईफ सुरू होणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. नाइट लाइफमुळे मुंबई पोलिसांवर ताण येणार नाही, असेही आदित्य ठाकरेंनी आज (२२ जानेवारी) पत्रकार परिषदेत म्हणाले. तसेच पब आणि बारसाठी नवे नियम नाह तर पूर्वीचे नियम असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबईतील पर्यावरणाला वाढ देण्यासाठी नाईट लाईफची गरज असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. त्यानुसार मुंबईत अनिवासी भागातील सर्व थिएटर, मॉल्स, रेस्टॉरंटस् 24 तास खुले ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे. नरिमन पॉईंट, काला घोडा, बीकेसी, कमला मिल अशा मुंबईतील अनिवासी भागात नाईट लाईफ सुरु होणार आहे.

Related posts

हिंगोली जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४६ वर

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राममंदिर भूमीपूजनाचं निमंत्रण नाही,फक्त ‘या’मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

News Desk

देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण नको, पवारांचा राहुल गांधींना सल्ला

News Desk