मुंबई | कोरोना विरुद्ध सध्या संपूर्ण जग लढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी क्वॉरंटाईनच्या सुविधा वाढवल्या जात आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडिअम क्वॉरंटाईन सेंटरसाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु होत्या. तसेच, ब्रेबोन स्टेडिअमदेखील ताब्यात घेतले जावे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. त्यांच्या या मागणीला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोध केला आहे.
स्टेडिअम किंवा खेळाची मैदाने आपण ताब्यात घेऊ शकत नाही. मैदाने ही मातीची असल्यामुळे पावसाळ्यात तिथे चिखल होऊ शकतो. टणक पृष्ठभूमीची गरज क्वॉरंटाईन सेंटरसाठी असून त्यावर व्यवस्था करता येईल आणि आपण तशी करत आहोत, असे उत्तर आदित्य ठाकरंनी दिले आहे. त्यामूळे वानखेडे स्टेडियम क्वॉरंटाईन सुविधेसाठी वापरले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच, क्वारंटाइन सेंटरसाठी कोणतेही मैदानात ताब्यात घेतले जाणार नसल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनीही दिली आहे. दरम्यानच्या काळात महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून कोरोनाबाधित रुग्णांची वानखेडे स्टेडिअममध्ये व्यवस्था करता येईल का याची पाहणी करण्यात आली होती. पण वानखेडे परिसरातील स्थानिक नागरिकांनीही याला विरोध केला होता.
Sanjay ji, we can’t take the grounds of the stadiums or playgrounds because they have a mud base and they won’t be usable during monsoons. An open space with a solid/ concrete base is usable and it’s being done already.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 17, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.