HW News Marathi
Covid-19

रुग्णालयात फक्त ३ तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक ! आप आमदाराची आर्त हाक

नवी दिल्ली । देशातील कोरोनास्थिती भयावह आहे. ऑक्सिजनचा तुटवडा मोठा आहे. महाराष्ट्रासह आता देशाचे राजधानी शहर असलेल्या दिल्लीतील कोरोना परिस्थितीही प्रचंड बिघडली आहे. दिल्लीतील रुग्णालयातही ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी याच गंभीर समस्येकडे लक्ष वेधत आज (२२ एप्रिल) एक व्हिडीओ पोस्ट केला. ह्या व्हिडीओत स्वतः सौरभ भारद्वाज यांनाही श्वसनाचा त्रास होत असून दीर्घ श्वास घेण्याची गरज भासत असल्याचे दिसत आहे.

सौरभ भारद्वाज यांनी आपल्या या व्हिडीओमध्ये भावनिक आवाहन केले आहे. “आता एकमेकांचा पाय खेचण्याची वेळ नाही, तर एकत्र काम करण्याची वेळ आली आहे”, असेही सौरभ भारद्वाज यांनी या व्हिडिओत म्हटले आहे. सौरभ भारद्वाज आपल्या या व्हिडिओत एक धक्कादायक माहिती देत म्हणाले की, ज्या रुग्णालयात मला दाखल करण्यात आले आहे त्या रुग्णालयात आता फक्त ३ तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. देशातील ही स्थिती हादरवून टाकणारी आहे.

आपल्या व्हिडीओत सौरभ भारद्वाज म्हणतात की, “मला ज्या रुग्णालयात दाखल केले आहे त्या रुग्णालयात फक्त ३ तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक आहे. जेव्हा जेव्हा मी हा मास्क काढला तेव्हा मला पोहायला येत नसताना तलावात ढकलल्यासारखं वाटत आहे आणि श्वासोच्छवासासाठी जबरदस्ती केली जात आहे. केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारला मागणी करेन की ऑक्सिजन पुरवठा थांबवू नये. बरेच लोक ऑक्सिजनवर अवलंबून आहेत. नाहीतर पाणी नसल्याने जसे मासे मरतात तसेच ऑक्सिजनशिवाय लोक मरतील”, असे भावनिक आवाहन भारद्वाज यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट

News Desk

शरद पवार, आरोग्यमंत्री आणि पालक मंत्र्यांसह सोलापूर दौऱ्यावर, परिस्थितीची करणार पाहणी

News Desk

…नमस्कार, मी धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून बोलतोय !

News Desk