HW News Marathi
महाराष्ट्र

‘आरे’मधील मेट्रो कारशेड अखेर रद्द, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (११ ऑक्टोबर) जनतेशी संवाद साधला. यात त्यांनी अनेक महत्त्वाची माहिती दिली. त्यात आरे कारशेड प्रकरणी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आरेत मेट्रोचे कारशेड होणार नसल्याची महत्वाची माहिती आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईकरांसाठी हो सर्वात मोठी घोषणा असुन आरेची 800 एकर जागा जंगल घोषित करणार आहेत.

आरे आंदोलनावेळी पर्यावरणवाद्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याचे जाहीर केले. आरेतील जंगलाचे क्षेत्र ६०० एकरावरून ८०० एकरापर्यंत वाढवण्यात आले आहे.. आपण आरेतील झाडे कापून तयार करण्यात आलेले मेट्रो कारशेडचे काम थांबवले आहे. आता मेट्रोची कारशेड कांजूरमार्ग येथे उभारण्यात येईल. मात्र, यामुळे आरेतील कारशेडसाठी आतापर्यंत खर्च झालेला पैसा फुकट जाणार का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

परंतु, राज्य सरकार जनतेचा एकही पैसा फुकट जाऊ देणार नाही. आरेत मेट्रोच्या कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत अन्य कामांसाठी वापरली जाईल. तसेच या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरित मार्गाशी जोडले जातील, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडेल – नारायण राणे

News Desk

समाजप्रबोधनकार आणि लोकप्रतिनिधींनाच कोरोनाचा विसर

News Desk

अंगणवाडीतील बालकांना घरपोच शिधा – यशोमती ठाकूर

News Desk