HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

तेजस ठाकरेंना गोगलगायीसंदर्भात संशोधनासाठी परवानगी, आशिष शेलारांची ही प्रतिक्रिया

मुंबई | “तेजस ठाकरे यांनी खेकडे,पाली नंतर गोगलगाईच्या संशोधनासाठी परवानगी मागितली त्याला वन्य जीव मंडळाने मंजूरी दिली, ही अत्यंत चांगली बाब आहे”, असे म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांना गोगलगायीसंदर्भात पश्चिम घाट संरक्षित क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. तेजस ठाकरे यांनी त्याबाबत महाराष्ट्र शासनाला पाठवलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर, आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“तेजस ठाकरे यांनी खेकडे,पाली नंतर गोगलगाईच्या संशोधनासाठी परवानगी मागितली त्याला वन्य जीव मंडळाने मंजूरी दिली, ही अत्यंत चांगली बाब आहे. निसर्ग प्राणीमात्रेची निर्मिती विशिष्ट हेतूने करतो. आपण त्याबद्दल अनभिज्ञ असतो. त्यामुळे संशोधन आवश्यकच. महाराष्ट्राचा हा पुढाकार आनंददायीच”, असे म्हणत आशिष शेलार यांनी तेजस ठाकरेंसह त्यांच्या या संशोधनासाठी परवानगी देणाऱ्या महाराष्ट्र सरकारचे देखील कौतुक केले आहे. दरम्यान, ट्विटरच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Related posts

चांदोली अभयारण्यग्रस्त प्रकल्पग्रस्तांना ४ कोटी १९ लाख रुपयांचा रखडलेला उदरनिर्वाह त्याचे वाटप

News Desk

पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून २७ प्रवाशी ठार

News Desk

त्रिपुरामध्ये सत्ता येताच भाजपचा उपद्रव सुरू

News Desk