HW News Marathi
महाराष्ट्र

पंढरपूरची निवडणूक थांबवण्यासाठी बिचूकले जाणार थेट निवडणूक आयोगाकडे!

पंढरपूर | राज्यात एकीकडे कोरोना आहे तर दुसरीकडे निवडणूकीचे वारे वाहात आहेत. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक येऊ घातली असताना अनेक गोष्टी घडत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत बिचुकले यांनी केली आहे. राज्य निवडणूक आयोगाला यासंदर्भात विनंती करणार असल्याची माहिती बिचुकले यांनी दिली आहे.

इतकंच नाही तर ही पोटनिवडणूक न थांबवल्यास प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही अभिजित बिचुकले यांनी दिला आहे. १२ एप्रिलला आंदोलन करण्याचा इशारा अभिजीत बिचुकले यांनी दिला आहे. दरम्यान, निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर सभेसाठी विविध भागातून जे नेते येतात त्यांच्यामुळे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात कोरोना वाढत असल्याचा आरोप बिचुकलेंनी केला आहे.

देशातील प्रत्येक निवडणूक लढवणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे मानणाऱ्या अभिजित बिचुकले यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. अभिजित बिचुकले यांचा सामाजिक, राजकीय, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील वावर कायम चर्चेचा विषय असतो. आतापर्यंत बिचुकले यांनी लोकसभा, विधानसभा अगदी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक लढवून झाली आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही निवडणुकीत ते विजयी झाले नाहीत. तरीदेखील अभिजित बिचुकले हे चिकाटीने मोठमोठ्या निवडणुका लढवत असतात.

आताही बिचुकले यांच्या उमेदवारीमुळे पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारात रंगत येणार आहे. त्यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. विठुरायाच्या नगरीची झालेली दुर्दशा बघवत नाही. राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असल्याचे बिचुकले यांनी सांगितले होते.

काही महिन्यांपूर्वीच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूकही बिचुकले यांनी लढवली होती. मात्र, त्यावेळी मतदानाला गेलेल्या बिचुकले यांचे नावच मतदार यादीत सापडले नव्हते. त्यामुळे अभिजित बिचुकले यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. त्यापूर्वी २०१९ मध्ये अभिजित बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून थेट शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता.

उद्धव ठाकरेंना आवाहन

निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी ते एकटेच आले होते. शंका आल्यानं पोलिसांनी त्यांना अडवले असता मी उमेदवार असल्याचा खुलासा त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ‘फोन टॅपिंग प्रकरणात पोलिसांवर कारवाई व्हायला हवी. उद्धवदादा तुम्ही कारवाई करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,’ अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यानं प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यानं कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना अवघी १५० मतं मिळाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागरिक-स्नेही उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील चार शहरांचा केंद्राकडून गौरव

News Desk

राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाचा अधिनियम लागू

Aprna

मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांबाबत महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी – फडणवीस 

News Desk