HW News Marathi
Covid-19

‘कोविड’साठी मुख्यमंत्री सहायता निधीतून सुमारे १२३ कोटी खर्च

मुंबई | मुख्यमंत्री सहायता निधीत आत्तापर्यंत ३६१ कोटी ३२ लाख ५७ हजार ५९९ रुपये जमा झाले असून त्यापैकी १२३ कोटी ३९ लाख १२ हजार ४१० इतकी रक्कम कोरोनाविषयक विविध कारणांसाठी खर्च झाली आहे. आत्तापर्यंत १ लाख २९ हजार दात्यांनी निधी दिला आहे. राज्य शासनाकडून आज (३१ मे) याबाबतची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबादजवळ झालेल्या रेल्वे अपघातातील मजुरांना ८० लाख, सेंट जॉर्ज रुग्णालयासाठी २० कोटी, ३ कोटी ८२ लाख ५० हजार रुपये कोविड चाचणीसाठी, मजुरांच्या श्रमिक रेल्वेवरील तिकीट खर्चापोटी ९७ कोटी ६९ लाख ५५ हजार ४९० रुपये आणि रत्नागिरी येथील प्रयोगशाळेसाठी १ कोटी ७ लाख ६ हजार ९२० असा निधी मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही कमी

News Desk

HW Exclusive : अजित पवार मुख्यमंत्री होणार का ?

News Desk

माऊलींच्या पादुका ३० जूनला एसटीने पंढरपूरला जाणार !

Arati More