HW News Marathi
महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यापीठात ABVP चे पुंगी बजाव आंदोलन

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोठा गदारोळ झाला असून, अखिल भारतील विद्यार्थी परिषदेने पुंगी बजाव आंदोलन केलं आहे. विद्यापीठातील विविध विभागांतील परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेत १४ हजारांपेक्षा जास्त तक्रारी विद्यापीठाकडे पाठवल्या होत्या. त्यानंतरही विद्यापीठाचा कारभार संथ गतीनं सुरू आहे. विद्यापीठाच्या या कारभाराविरोधात एबीव्हीपीने आंदोलन केलं असून, बॅरिकेटिंग तोडून आंदोलक आत घुसले आहेत.

तर काही वेळाने कुलगुरू आंदोलकांच्या भेटीला जाणार असल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत उपकुलगुरु यांच्या गाडीला घेराव घातला. उपकुलगुरु एन. एस. उमराणी यांना धकाबुक्कीसुद्धा करण्यात आली आहे. जोपर्यंत कुलगुरू बाहेर येत नाहीत, तोपर्यंत आम्ही जाणार नसल्याचंही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलकांनी सांगितलं आहे. गेल्या दीड तासांपासून आंदोलन सुरू आहे. कुलगुरूच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा आंदोलकांनी केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेमध्ये जिहादी दहशतवादशी संबंधित प्रश्न शुक्रवारी विचारल्याने वाद निर्माण झाला आहे. जिहादी दहशतवादाचे मुख्य कारण कोणते, या प्रश्नाच्या उत्तरासाठी दिलेले पर्यायही खटकणारे असल्याने, त्यात आणखी भर पडली आहे. दरम्यान, या प्रश्नाबाबत विद्यापीठ प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांकडून खुलासा मागविला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट’, ओबीसी आरक्षणावरून राज ठाकरे संतप्त!

News Desk

“नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली तर…”

News Desk

“कोंबडी चोर !!!”, नारायण राणेंविरोधात पोस्टरबाजी

News Desk