HW News Marathi
महाराष्ट्र

महाराजांच्या पुतळ्याला उन्हात जाऊन अभिवादन करायला त्रास होतो का? अजित पवारांचा मुनगंटीवारांना खोचक टोला

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती साजरी केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभागृहात आज (२१ मार्च) पुन्हा एकदा तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहे. सभागृहात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवजयंती निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज मुंबई विमानतळाबाहेर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्याचा मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री स्वत: तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात. मग विधीमंडळातील शासकीय अधिकारी मात्र १९ फेब्रुवारीला शिवजंयती साजरी करतात?, यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. यारव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पलटवार करत म्हणाले, “प्रांगणातमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. जेणा अभिवादन करायचे आहे तिथे जावून अभिवादन करा, काही बिगडत नाही. छोट्या फोटोसमोर अभिवादन करण्यापेक्षा मोठ्या पुतळ्याजवळ अभिवादन करा ना. उन्हात जाऊन करायला काही त्रास होतो का?, सिंहासनावर बसलेले महाराज आहेत.” 

मुनगंटीवार म्हणाले, “आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हे मुख्यमंत्री स्वत: एका कार्यक्रमाला केले आहेत. मुख्यमंत्री हे तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आहेत. शिवसेनेचे काही आमदार आणि भाजपचे आमदार आम्ही जावून शिवाजी महाराजांना वंदन केले आणि नमन अभिवादन केले. आपण जयंतीच्या दिवशी जे जे महामानव आहेत त्यांच्या फोटो लिफ्टच्या येथे ठेवतो. येथे प्रत्येत आमदार आणि अध्यक्ष त्याठिकाणी पुष्प हार अर्पण करतात. म्हणजे आता सरकारची भूमिका काय आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री हे तिथीप्रमाणे मुख्यमंत्र्यांची जयंती साजरी करत आहेत. आणि ज्या सरकारचे ते प्रमुख आहेत. आणि दुसरीकडे सरकारी अधिकाऱ्याकडून मी माहिती घेतोय ते म्हणतात आम्हाला तिथी मान्य नाही. अशी ही द्विधा मनस्थिती आहेत. राज्याचे मुख्यमंत्री तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहेत. ते स्वत: कार्यक्रमाला गेलेत आणि राज्याचे अधिकारी म्हणतात. आम्ही १९ फेब्रुवारी १६३० रोजी जन्म झाला म्हणून आम्ही १९ फेब्रुवारी साजरी करू. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, ही काय परिस्थिती चांगली नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी पण सांगितले की, तिथीनुसार शिवजंयती साजरी करावी. महाराजांच्या फोटोला आपण रोज नमन आणि अभिवादन केले तरी काही बिघडत नाही. पण, जर तिथीप्रमाणे मुख्यमंत्री शिवजयंती साजरी करत आहेत. आज भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी साजरी केली.  तर सरकार म्हणून सामान्य प्रशासन विभाग म्हणून शासन म्हणून हे उत्तर अपेक्षित नाही. आम्ही १९ फेब्रुवारी साजरी करू. मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने साजरी केली. आपण करायला आदेश द्यावे. ताबडतो तिथे महाराजांची एक फोटो लावून आपण आदेशाप्रमाणे पुष्प हार अर्पण करावे.” 

यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “हे सरकार येण्याच्या आधीर सुधीर मुनगंटीवार यांनी पाच वर्ष अर्थमंत्री म्हणून काम केले आहे. पाच वर्ष मी पण सभागृहात येत होतो. त्याही काळात अधिवेशन चालू असायचे. त्यावेळी तिथीनुसार अशा प्रकारची येथे फोटो लावले गेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तिथीप्रमाणे केव्हा तारखे यात वाद घालण्यापेक्षा ते आपल्या सर्वांचे दैवत आहे हे त्रिवार सत्य आहे. या दुमत असण्याचे काहीच कारण नाही. पण पाटीमागच्या काळातमध्ये तेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो. मुख्यमंत्री जेथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिथे जावून अभिवादन करतात. ही परंपरा आजपर्यंत सुरू आहे. आणि ही परंपरा आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी ती चालूच ठेवली आहे. यानुसार राज्य सरकार १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. आणि आज राज्याचे मुख्यमंत्री का तेथे गेले. कारण आज ते शिवसेना प्रमुख म्हणून ते तेथे गेलेत. शिवसेना पहिल्यापासून म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना देखील ते तिथीप्रमाणे साजरी करत आलेले आहेत. आणि आम्ही देखील सरकारमध्ये असताना तारखेप्रमाणे साजरी करत होतो. आज आमच्या मंत्री मंडळातील आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, दादा मी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार आणि अभिवादन करून येतो. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला असेल किंवा भाजपला असेल. कोणत्याही सदस्याला तिथीनुसार शिवजयंती साजरी करायची असेल तर त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करू शकता. सहभागी होऊ शकतात. यात कारण नसताना वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करून अधिकारी वर्गाला काय सांगितेल १९ फेब्रुवारीला सुट्टी देतो. तेव्हा सगळे जण त्या पद्धतीने जयंती साजरा करतात. आज सुट्टी नसते आपण कामावर असतो. येथे शिवाजी महाराजांना सुट्टी देणे आणि महाराजांच्या जयंतीच्या दिवशी काम करणे हे देखील अभिप्रयेत आहेत. म्हणून आम्ही तसे करतो.  

उन्हात जाऊन करायला काही त्रास होतो का?; अजित पवारांचा मुनगंटीवारांना सवाल

अजित पवारांच्या उत्तरावर पुन्हा मुनगंटीवार म्हणाले, “मागे तसे केले नाही, म्हणून भविष्यात तसे करता येत नाही. पण आम्ही जेव्हा तुम्हाला सूचना करतोय. आज सर्वत्र शिवजयंती साजरी करत आहेत. तर आपण फोटो लावून येतेथ पुष्पहार ठेवावे. यात अशा पद्धतीचे उत्तर देणे अपेक्षित नाही. आमची अपेक्षा ही की, जेव्हा एखादी गोष्ट आपल्या लक्षात येते. तेव्हा ती सुधारणा करणे आम्ही लक्षात आल्याबरोबर प्रशासनाला विचारणा केली. प्रशासनानी सांगितले की, आम्ही हे करणार नाही. म्हटले का करणार नाही, जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री तिथीप्रमाणे म्हणतात. मग करायला अडचण काय?, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला.  यावर पुन्हा अजित पवारांनी उत्तर देताना म्हटले, आपल्या प्रांगणातमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. जेण्या अभिवादन करायचे आहे तिथे जावून अभिवादन करा. काही बिगडत नाही. छोट्या फोटोसमोर अभिवादन करण्यापेक्षा मोठ्या पुतळ्याजवळ अभिवादन करा ना. उन्हात जाऊन करायला काही त्रास होतो का?, सिंहासनावर बसलेले महाराज आहेत.

         

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शांतता, स्थैर्य आणि सुरक्षेसाठी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद! – UNचे सरचिटणीस एच.ई.अँटोनियो गुटेरेस

Aprna

गणेशोत्सवासाठी साकारलं गिरणगाव!

News Desk

मास्कची किंमत सर्वाधिक कमी करणारे महाराष्ट्र हे ठरले पहिले राज्य!

News Desk