मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी २५ जुलै रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर सचिनह अहिर यांना शिवसेनेकडून मोठी जबाबदरा देण्यात आली आहे. सचिन अहिर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करुन अहिर यांना शुभेच्छा दिल्या.
माझे सहकारी @AhirsachinAhir जी तुमची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! आता फक्त वरळीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी तुम्ही अधिक जोमाने काम करतील असा मला विश्वास आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 29, 2020
‘माझे सहकारी सचिन अहिरजी तुमची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! आता फक्त वरळीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी तुम्ही अधिक जोमाने काम करतील असा मला विश्वास आहे.’ असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ‘पाठिंबा आणि विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद’ असं म्हणत सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंचे आभार व्यक्त केले
I am very thankful to our Shivsena chief CM @uddhavthackeray Ji for believing in my work & appointing me as Shivsena's Deputy leader. I will work to the best of my abilities for the people of Maharashtra & my party. I also thank @AUThackeray Ji for his support & faith in me. pic.twitter.com/Oq64erShnN
— Sachin Ahir (@AhirsachinAhir) February 29, 2020
“शरद पवार ह्रदयात, पण आता शरीरात बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचे बळ घेऊन पक्षासाठी कार्यरत करणार असून राष्ट्रवादी तोडण्याचे काम आम्ही करणार नाही, पण शिवसेना वाढवण्यासाठी निश्चितच काम करू” अशी प्रतिक्रिया अहिर यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर दिली.
सचिन अहिर यांचा अल्पपरिचय
- सचिन अहिर यांचा जन्म २१ मार्च १९७२ रोजी झाला आहे.
- अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांचे ते भाचे आहेत.
- वरळीच्या प्रेम नगर, सिद्धार्थ नगर, जिजामाता नगर, गांधी नगर, बीडीडी चाळींमध्ये अरूण गवळींच्या असलेल्या प्रभावाचा सचिन अहिर यांनी फायदा झाला
- १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी मामा अरुण गवळी यांची त्यांना मदत झाली होती.
- अरुण गवळी यांनी स्वतः अखिल भारतीय सेना हा पक्ष स्थापन केला होता. पण सचिन अहिर यांनी कधीही त्या पक्षात प्रवेश केला नाही.
- २००९ साली आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री होते. मात्र या काळात बीडीडी चाळींचा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना अपयश आले होते.
- २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी सचिन अहिर यांचा पराभव केला होता.
- सचिन अहिर यांना वरळी परिसरातून पाठिंबा आहे. सचिन अहिर यांची श्री संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी मुंबईमधल्या प्रसिद्ध दहीहंडींपैकी एक आहे.
- सचिन अहिर यांचे बॉलिवूड कनेक्शनही आहे. त्यांची पत्नी संगीता अहिर या बॉलिवूड चित्रपट निर्मात्या आहेत. मंगलमूर्ती फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसमध्ये त्यांची भागीदारी आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.