मुंबई | दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचे धाकटे भाऊ आणि अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झालं आहे. ते ५८ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मंगळवारी (९ फेब्रवारी) त्यांची प्राणज्योत मालवली आहे. अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. “मी माझा धाकटा भाऊ आज गमावला आहे. आता तो या जगात नाही. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. मी आता रुग्णालयात आहे आणि त्याचं शव मिळण्याची वाट पाहतोय”, अशी पोस्ट रणधीर कपूर यांनी केली आहे. तर रणधीर यांच्याप्रमाणेच नीतू कपूर यांनी देखील राजीव कपूर यांचा फोटो शेअर केला आहे.
राजीव कपूर अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक होते. राजीव कपूर यांनी ‘एक जान हैं हम’ या चित्रपटातून १९८३ साली बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात ते मुख्य भूमीकेत दिसून आले होते. या शिवाय त्यांनी आसमान (१९८४), लवर बॉय (१९८५), जबरदस्त (१९८५) और हम तो चले परदेस (१९८८) चित्रपटात काम केले आहे. राजीव कपूर यांनी आ अब लौट चलें (१९९९), प्रेमग्रंथ (१९९६) और हैना (१९९१) या चित्रपटाचे निर्माते होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.