HW News Marathi
महाराष्ट्र

मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची राष्ट्रवादीत!

मुंबई। मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना सुरेखा कुडची यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आज दुपारी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरेखा कुडची यांचा हा पक्षप्रवेश पार पडला आहे. या वेळी भाजपच्या बऱ्याच अभिनेत्री कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कुडची यांनी आतापर्यंत 50 वर मराठी चित्रपटांसह काही हिंदी चित्रपटांतही अभिनय केला आहे. त्यांनी आतापर्यंत आपल्या लावणी नृत्यावर संपूर्ण महाराष्ट्राला थिरकायला लावलं आहे.

कोण आहेत सुरेखा कुडची?

सुरेखा कुडची या अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. त्या 1997 मध्ये चित्रपट अभिनय क्षेत्रात आपलं पाऊल टाकलं आहे. त्यांचा पहिला मराठी चित्रपट ‘ अशी असावी सासू’ हा आहे. सुरेखा यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. ‘भरत आला परत’, ‘तुच माझी राणी’, ‘सासुची माया’, ‘खुर्ची सम्राट’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘फॉरेनची पाटलीन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्या झळकल्या आहेत तसेच त्यांनी ‘रुंजी’ आणि ‘देवयानी’, ‘चाहूल 2’ या मालिकांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत बहुचर्चित ‘मीना आत्या’ ही त्यांची भूमिकाही खुप गाजते आहे.

अनेक मान्यवर उपस्थित

राष्ट्रवादीत अनेक मराठी कलाकार आहेत. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, ज्येष्ठ अभिनेत्री आणि राष्ट्रवादी चित्रपट विभागाच्या प्रदेश सरचिटणीस सविता माल्पेकर, ज्येष्ठ अभिनेत्री आणि पुणे जिल्हाध्यक्षा प्रिया बेर्डे, ख्यातनाम गायिका आणि विदर्भ विभागाच्या अध्यक्षा वैशाली माडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. पक्षाकडून लगेच सुरेखा कुडची यांची राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साहित्य संमेलन ही नाशिकचा लौकिक उंचावण्याची संधी! – छगन भुजबळ

News Desk

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक

News Desk

उल्हासनगरात मुस्लिम समाजाचं कब्रस्तानासाठी उपोषण

News Desk