HW News Marathi
महाराष्ट्र

‘अदानींचं नाव देणं ही सर्वात मोठी चूक’, नवाब मलिकांची संतप्त प्रतिक्रिया!

मुंबई। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावण्यात आला होता. पश्चिम द्रुतगती महामार्गावर उभारण्यात आलेला हा बोर्ड शिवसैनिकांनी आज फोडला आहे. त्यावरुन आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव बदलून अदानी विमानतळ करणं योग्य नाही, ही अदानींची सर्वात मोठी चूक असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

नवाब मलिक यांचा सल्ला

जीव्हीके एअरपोर्टकडून अदानीने सर्व मालकी आणि शेअर्स खरेदी केल्यानंतर विमानतळाची मालकी अदानींकडे गेली. परंतु याचा अर्थ हा नाही की छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नाव बदलून अदानी एअरपोर्ट करावं. त्यांच्याकडे मॅनेजमेंटचा अधिकार आहे. मात्र, नाव बदलण्याचा किंवा नाव ठेवण्याचा अधिकार नाही, असंही नवाब मलिक म्हणाले. अदानी एअरपोर्ट लिहिणे हे योग्य नाही. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे तशी घटना त्याठिकाणी घडली आहे. अदानीने लोकांची भावना दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे.

काय घडलं नेमकं?

व्हीआयपी गेट नंबर 8 आणि विलेपार्ले हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील बोर्ड शिवसैनिकांनी लाठ्यांनी तोडला. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. मात्र तिथे अदानी विमानतळ असे लावलेले बोर्ड अजिबात सहन केले जाणार नाहीत, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. जीवीके प्रमाणे ‘मॅनेज्ड बाय अडानी एयरपोर्ट’ असा बोर्ड ठेवण्याची सूचना शिवसेनेने केली आहे. अन्यथा जिथे फलक दिसेल, तिथे तोडफोड करण्याचा सेना नेत्यांनी इशारा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडे पुन्हा एकदा पहिल्याच झंझावाताने राजकारणात उतरण्याच्या तयारीत!

News Desk

कोरोनाची जोखीम कमी करण्यासाठी लसीकरण अत्यावश्यक! – छगन भुजबळ

Aprna

परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातील सचिन वाझे कोण? भाजपचा सवाल!

News Desk