पुणे | कोरोनावरील लस तयार करत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटला भीषण आग लागली. दरम्यान, ही आग बीसीजी लस तयार करत असलेल्या नव्या इमारतीला लागली होती. आणि आग विझवण्यास अग्निशामन दलाला यश आले आहे. यानंतर सीरमचे सीईओ अदार पुनावाला यांनी ट्विट करत सगळ्यांचे आभार मानले आहे. तुम्ही दाखवलेली काळजी आणि प्रार्थनांसाठी आपले आभार. सध्याच्या घडीला आगीत काही मजले नष्ट झाले आहेत. कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही ही महत्वाची गोष्ट आहे असं ट्विट सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी केलं आहे.
मांजरी येथील या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतली जाणारी बीसीजी लस तयार केली जाते. त्या विभागाला ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाचं म्हणजे करोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लस तयार केली जाते तेथून हा भाग काही अंतरावर आहे. सुदैवाने आगीची झळ तिथपर्यंत पोहोचलेली नाही. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट दिसत होते. यामुळे घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती.
Thank you everyone for your concern and prayers. So far the most important thing is that there have been no lives lost or major injuries due to the fire, despite a few floors being destroyed.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) January 21, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.