HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महाराष्ट्र बंद मागे घेण्याची घोषणा

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद मागे घेण्याची घोषणा केली आहे. राज्यात शांतपणे बंद पार पडल्याची माहिती आंबेडकरांनी आज (२४ जानेवारी) पत्रकार परिषदेत दिली आहे. आमच्या बंदला राज्यातील जनतेने सात दिल्याची आंबेडकरांनी सांगितले. राज्यातील काही जिल्ह्यात बंदला हिंसक वळण आले होते. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आंबेडकर हिंसा झालेल्या ठिकाणी पोलिसांशी संवाद साधणार असल्याचे म्हणाले. वंचितच्या बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद  मिळाला आहे. तर  मुंबई, नाशिक, नागपूरमध्ये बंदला फार प्रतिसाद पाहायला मिळाला.

“केंद्र सरकारने आता जागे होऊन, एनआरसीबाबत आपले पाऊल मागे घ्यावे. आमच्या बंदला ३५ संघटनांनी पाठिंबा दिला होता. तर बंदात १०० अधिक संस्था  सहभागी झाल्या होत्या. आमचा बंद यशस्वी झाला. आम्हाला सरकार आणि जनतेला या संदेश देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला होता,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीकडून आज सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदमध्ये सुमारे ३५ संघटना सहभागी होती, असा दावा ‘वंचित’कडून करण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आला होता.

Related posts

भाजपासारखे आकडे फेकायला आपण काय रतन खत्री आहोत काय? | राज ठाकरे

News Desk

इम्रान खान यांच्या भाषणादरम्यान बलुचिस्तानच्या समर्थकांनी दिल्या घोषणा

News Desk

देशातील प्रसिद्ध सांस्कृतिक स्मारके ६ जुलैपासून खुली केली जाणार?

News Desk