HW News Marathi
महाराष्ट्र

रक्तदान केल्यावर लगेच साईबाबांचं दर्शन

  • शिर्डी संस्थांनचा अभिनव उपक्रम

शिर्डी – देवदर्शनासाठी तासनतास भाविकांच्या रांगा लागतात. त्यात व्हिआयपी दर्शनासाठी वेगळीच नियमावली. अशा परिस्थितीत शिर्डी देवस्थानानं एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. जे भाविक रक्तदान करतील त्यांना तात्काळ साईबाबांचं दर्शन दिलं जाणार आहे.

विविध लोकाभिमुख उपक्रमांमध्ये शिर्डी संस्थानाचा पुढाकार राहिलेला आहे. शिवाय भक्तांच्या सोयीच्याही अनेक योजना इथं राबविल्या जातात. त्यात आता रक्तदान करणाऱ्या भक्तांना तात्काळ साईदर्शनाच्या उपक्रमाची भर पडली आहे.

शिर्डी संस्थानच्या रक्तदान युनिटमध्ये यापुढं रक्तदान केल्यास व्हीआयपी पास मोफत दिला जाणार आहे. यामुळं रक्तदानाकडं भाविकांचा ओढा वाढेल आणि या रक्ताचा फायदा गरजूंना होईल असं विश्वस्तांना वाटतं. साईबाबांच्या चरणी येऊन कोणतंही दान करण्यापेक्षा रक्तदान करण्याची ही आयडीया भक्तांनाही आवडली आहे. या अभिनव उपक्रमाचं अनुकरण इतर देवस्थानांनीही करण्याची गरज आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने किरीट सोमय्या आणि राणांना रोजगार मिळवून दिलाय; नीलम गोरेंचं टीकास्त्र

Manasi Devkar

पवारांची केंद्रावर टीका

News Desk

“बरळत ‘रा(ह)णे’ तुमचं काम आहे, जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे”

News Desk