HW News Marathi
महाराष्ट्र

बाथरुममध्ये पडल्याने अतिरिक्त मुख्य गृहसचिव आयसीयूत

मुंबई | महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) सध्या बॉम्बे रुग्णालयात दाखल आहेत. महाबळेश्वरला गेले असताना पोरवाल हे बाथरुममध्ये पडले ज्यामुळे त्यांच्या बरगड्या तुटल्या आहेत. राज्याचे मुख्य सचिव डी.के.जैन आणि पोरवाल हे आपल्या कुटुंबियांसोबत सुट्टीसाठी महाबळेश्वरला गेले होते.

बाथरुममध्ये पडल्यानंतर पोरवाल यांच्या छातीमध्ये दुखू लागले. ज्यामुळे त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्या वेदना वाढत असल्याचे लक्षात आल्याने त्यांना तातडीने मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

सध्या त्यांना बॉम्बे रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे की पोरवाल यांची प्रकृती स्थिर असून त्यांना पूर्ण बरे होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील. राज्याचे पोलीस महासंचालक, दत्ता पडसलगीकर, मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पोरवाल यांची रुग्णालयात भेट घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यापुढे केवळ बीएस-IV मानकांच्या वाहनांचीच नोंदणी होणार

News Desk

केंद्रानंच कर्ज काढून राज्यांना निधी द्यावा आणि संकटातून बाहेर काढावं – अजित पवार

News Desk

राजीनाम्या पेक्षा आत्मपरिक्षण करा-ना.धनंजय मुंडे

News Desk