HW News Marathi
महाराष्ट्र

‘लोकल सुरू करण्याबाबत दोन दिवसात निर्णय कळेल’, आदित्य ठाकरेंची माहिती

मुंबई | लोकल सर्वसामान्यांसाठी अद्यापही सुरु नाही. यावरून मुख्यमंत्रयांना अनेंकानी पत्रं लिहिली मात्र सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. लोकल सुरू करण्याबाबत गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुढच्या एक दोन दिवसात त्याबाबतचा निर्णय कळेल, असं मोठं विधान राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे लोकल सुरू होण्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे.

तिसरी लाट येऊन रुग्णालये भरू नयेत

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तिसरी लाटेच्या धोक्याविषयी माहित दिली आहे. दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी म्हणून भाजप नेत्यांनी जोरदार आंदोलने केली आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना लोकल सुरू करण्याबाबत विचारण्यात आलं. लोकल सुरू करण्याबाबत गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून चर्चा सुरू आहे. पुढच्या एक दोन दिवसात त्याबाबतचा निर्णय कळेल. दोन डोस घेतलेल्यांना केवल लोकलच नाही तर इतर गोष्टीतही सूट देण्यात येऊ शकते. याबाबत काळजीपूर्वक चर्चा करूनच निर्णय घेऊ, असं आदित्य म्हणाले.

इतर देशात कोरोनाची संख्या वाढत आहे. आपल्याकडेही कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तिसरी लाट येऊन रुग्णालये भरू नयेत. लोकांना कोरोना होऊ नये याची खबरदारी घेत आहोत, असं सांगतानाच आंदोलन जरूर करावं, पण ही कारणेही समजून घेतली पाहिजे. यात राजकारण करू नये. लोकांचा जीव वाचवणं हे महत्त्वाचं आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

कृपया संयम सोडू नका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खार एच पश्चिम विभागातील पालिका विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. जिथे जिथे लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता देऊ शकलो नाही तिथल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना विनंती करतो की कृपया संयम सोडू नका. कोणी दुश्मन आहे आणि कोणी लाडके आहेत असं काही नाही. सर्व नागरिकांच्या जीवांची काळजी आहे. त्यामुळे या गोष्टी कराव्या लागतात, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“असा कोणता कोरोना आहे जो उद्धव ठाकरेंच्या लोकांना होत नाही पण हिंदू सणांमध्ये पसरतो?”

News Desk

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत! – आरोग्यमंत्री  

Aprna

उस्मानाबादत बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यक- दीड हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Aprna