HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंचा मंत्रिमंडळात समावेश होणार ?

गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला होता. हा विस्तार अखेर चौतिसाव्या दिवशी होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण 36 नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल अशी आशा आहे.

मंत्रिमंडळात आदित्य ठाकरेंची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात दुसरे ठाकरे पाहायला मिळणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारातील आदित्य ठाकरे हे आकर्षण ठरतील. त्यांना राज्यमंत्री की कॅबिनेट मंत्री देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेनेच्या उदय सामंत, अनिल परब, शंभुराज देसाई या नव्यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दोन अपक्षांना स्थान दिलं आहे. बच्चू कडू आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलंय. या दोन्ही नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. बच्चू कडू अचलपूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेत तर राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिरोळचे अपक्ष आमदार आहेत.

संभाव्य मंत्री

शिवसेना

मुंबई – अनिल परब, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, सुनील राऊत

कोकण – उदय सामंत किंवा भास्कर जाधव, वैभव नाईक किंवा दीपक केसरकर

पश्‍चिम महाराष्ट्र – अनिल बाबर, शंभुराजे देसाई, प्रकाश अबिटकर

मराठवाडा – संजय शिरसाट किंवा अब्दुल सत्तार, तानाजी सावंत

विदर्भ – आशिष जैस्वाल किंवा संजय रायमुलकर, बच्चू कडू, संजय राठोड

ठाणे – प्रताप सरनाईक

उत्तर महाराष्ट्र – गुलाबराव पाटील, दादा भुसे किंवा सुहास कांदे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जेवणाचं निमंत्रण दिलं पण हात बांधले असा प्रकार केंद्राने करून ओबीसींची शुद्ध फसवणूक केली’ -शरद पवार

News Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन

Aprna

अभियंताला मारहाण केल्याप्रकरणी सोशल मीडियावर आव्हाडांना अतिशय खालच्या भाषेत केले ट्रोल

News Desk