HW News Marathi
Uncategorized

काँग्रेसची 10 नेत्यांची यादी जाहीर, मात्र पृथ्वीराज चव्हाणांचे नाव नाही

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी दुपारी 1 वाजता होत आहे. महाविकासआघाडीतील एकूण 36 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामधील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 13 आणि काँग्रेसचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेसचे जे 10 मंत्री शपथ घेणार आहे त्यांची यादी समोर आली आहे. यामध्ये 8 कॅबिनेट मंत्री आहेत. तर 2 जणांना राज्यमंत्रीपद देण्यात येणार आहे. या यादीमध्ये अशोक चव्हाणांसह, विजय वडेट्टीवार यांच्यासह दहा जणांची नावे आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार अशा चर्चा होत्या मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही असे या यादीवरुन स्पष्ट होत आहे. मात्र आता काँग्रेसकडून त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

काँग्रेसकडून अशोक चव्हाण, के. सी. पाडवी, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनील केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अस्लम शेख या नेत्यांच्या गळ्यात कॅबिनेट पदाची माळ पडणार आहे. तर सतेज पाटील, विश्वजीत कदम राज्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार असल्याचे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले आहे.

विधानभवनाच्या प्रांगणात राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज महाविकास आघाडीतील एकूण 36 मंत्री शपथ घेणार आहे. या कार्यक्रमासाठी साडेचार हजार आसन क्षमतेची व्यवस्था करण्यात आली आहे. तर 2 हजार पेक्षा जास्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

काँग्रेसचे हे नेते घेणार शपथ

  • अशोक चव्हाण (कॅबिनेट मंत्री) – भोकर (नांदेड)
  • के सी पाडवी (कॅबिनेट मंत्री) – अक्कलकुवा (नंदुरबार)
  • विजय वडेट्टीवार (कॅबिनेट मंत्री) – ब्रह्मपुरी (चंद्रपूर)
  • अमित देशमुख (कॅबिनेट मंत्री) – लातूर शहर (लातूर)
  • सुनिल केदार (कॅबिनेट मंत्री) – सावनेर (नागपूर)
  • यशोमती ठाकूर (कॅबिनेट मंत्री) – तिवसा (अमरावती)
  • वर्षा गायकवाड (कॅबिनेट मंत्री) – धारावी (मुंबई)
  • अस्लम शेख (कॅबिनेट मंत्री) – मालाड पश्चिम (मुंबई)
  • सतेज पाटील (राज्यमंत्री) – कोल्हापूर (विधानपरिषद)
  • डॉ. विश्वजीत कदम (राज्यमंत्री) – पलुस कडेगाव (सांगली)
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Nandurbar | नंदुरबार मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात, राहुल गांधी देणार अध्यक्ष पदाचा राजीनामा ?

News Desk

व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर, एकापेक्षा जास्त जणांना मेसेज पाठवण्यावर निर्बंध

News Desk