HW News Marathi
महाराष्ट्र

“महाविकास आघाडीमध्ये दूध साखरेसारखी ‌गोडी”- आदित्य ठाकरे

संगमनेर | आज संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे दंडकारण्य अभियान सांगता सोहळ्यात बोलताना अदित्य‌ ठाकरे यांनी हे वक्तव्य केलय. महाविकास आघाडी सरकार म्हणजे आमचे दूध आणि साखरे एवढे गोड संबंध आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. गेल्या दीड दोन वर्षापासून आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करतोय. आमच्यातील वातावरण विश्वासच असलं पाहिजे. शिवसेना आपल्या पोटात कधीच काही ठेवत नाही, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.

महाविकास आघाडी म्हणजे दुधात जशी साखर मिसळते तसे आम्ही एक

बाळासाहेब थोरात यांच्या दुधसंघात गेल्यावर मला कळलं की महाविकास आघाडी म्हणजे दुधात जशी साखर मिसळते तसे आम्ही एक झालो आहोत, असं वक्तव्य पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाषणातून केलंय. गेल्या 16 वर्षांपासून संगमनेर तालुक्यात महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळ्यात वृक्षारोपण करत दंडकारण्य अभियान राबविले जाते.आज दंडकारण्य अभियानाचा सांगता सोहळा पार पडला.राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्यमंत्री विश्वजित कदम उपस्थित होते.विशेष म्हणजे यावर्षी महाविकास आघाडी स्थापन झाल्याने दंडकारण्य सोहळ्याला शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

देशाचं नेतृत्व मिळालं तर महाराष्ट्राचा लौकिक वाढवतील असं दोघांचं व्यक्तिमत्त्व असल्याचे गौरद्गार महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी काढले. तर कोरोनामुळे आर्थिक अडचणी असताना विकासाकडे आम्ही लक्ष देत आहोत. मात्र काही मंडळी रोज देव पाण्यात बुडवून बसलीय.तर काही जण स्वप्न पाहताय तर काही जण स्वप्नात बडबडतायत, असा टोला विरोधकांना लगावताना पुढील तीन वर्ष सुद्धा एकत्र पद्धतीने महाविकास आघाडी काम करेल असा विश्वास महसूलमंत्री थोरात यांनी व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुख CBI चौकशीला आज सामोरे जाणार 

News Desk

राजू शेट्टींचे आज ‘चलो बारामती’ आंदोलन !

News Desk

“….तर या विरोधात कोर्टात चॅलेंज करणार” – समीर वानखेडे

News Desk