HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आदित्य ठाकरेचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई | विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे युवा नेते आदित्य वरळी मतदारसंघात निवडणुकीच्या मैदानात उरला आहे. आदित्य हा निवडणूक लढविणार पहिला ठाकरे आहे. आदित्य आज (३ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शवसैनिकांनी वरळी परिसरात ढोल-ताशाच्या गजरात आणि पदयात्रा काढण्यता आल्या आहेत. वरळीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरेंनी उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. आदित्य यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील हजारो शिवसैनिकांनी वरळीत गर्दी केली आहे.

उमदेवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी मातोश्रीवर निघताना शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. अर्ज भरण्यासाठी घरातून निघताना आदित्य आजोबांच्या खोलीत गेले. त्या ठिकाणी असलेल्या बाळासाहेबांच्या प्रतिमेसमोर ते नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. आदित्य यांनी हा फोटो ट्विटर हँडलेवर केला आहे. त्यामध्ये बाळासाहेबांनी वापरलेल्या विविध वस्तू दिसत आहेत. यामध्ये बाळासाहेबांचा बेड, त्यावर बाळासाहेबांची स्वाक्षरी असलेली उशी, त्यांचे उपरणे, काही पुस्तके, कागदपत्रे यांचा समावेश आहे.

आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आई रश्मी ठाकरे आणि भाऊ तेजस ठाकरे कुटुंबिय उपस्थित होते. वरळीत आदित्य ठाकरेंना मोठे आवाहन नाही. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे माजी आमदार सचिन अहिर यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मराठे कधी पाठीमागून वार करत नाहीत,समोरून वार करतात’, आमदार शशिकांत शिंदे भडकले

News Desk

Live Update : नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी संपन्न, २८२ आमदारांनी घेतली शपथ

News Desk

कंगनाची कोरोना चाचणी निगेटिव्ह, मुंबईच्या दिशेने रवाना!

News Desk