HW News Marathi
देश / विदेश

कौतुकास्पद ! सुप्रिया सुळेंचा दुहेरी सन्मान..संसद महारत्न पुरस्कार जाहीर

पुणे | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची संसदेतील उपस्थिती,सरकारला धारेवर धरण्याची त्यांची पद्धत या सगळ्याचं वारंवार कौतुक होत असते.संसदेकडून दिला जाणारा संसदरत्न हा पुरस्कार त्यांना याआधी प्राप्त झालेला आहे.आता त्यांना चैन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझिनतर्फे देण्यात येणार संसद महारत्न पुरस्कार हा पुरस्कार देखील जाहीर झाला आहे.त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही अत्यंत कौतुकास्पद बाब मानली जात आहे . खासदार सुप्रिया सुळे यांना २० मार्चला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सुप्रिया सुळेंचा दुहेरी सन्मान या कार्यक्रमात केला जाणार आहे.कारण संसद महारात्न पुरस्काराबरोबरच सुळे यांना १७ व्या लोकसभेतील त्यांची उपस्थिती आणि चर्चेतील सहभागासाठी सलग सहाव्यांदा जाहीर झालेला संसदरत्न पुरस्कारही याच कार्यक्रमात देण्यात येणार आहे. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना चैन्नईच्या फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा सोहळा होणार आहे.

सुप्रिया सुळेंचा लोकसभेत डंका

सोळाव्या लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या सभागृहात ९६ टक्के उपस्थिती लावत १५२ चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी एकूण ११८६ प्रश्न उपस्थित केले, तर २२ खासगी विधेयके मांडली. यासाठी त्यांना फाउंडेशनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काही भागातील लॉकडाऊन तरी शिथिल करावा, हसन मुश्रीफांची मागणी

News Desk

संजय राऊत दिल्लीत, भाजप नेत्यांची भेट घेणार?

News Desk

कोरोनापासून बचाव करण्यासाठी लक्ष्मण रेषा पाळा, पंतप्रधानांचे भारतीयांना आवाहन

swarit