HW News Marathi
देश / विदेश

संभाजीराजेंवर केलेल्या आक्षेपार्ह टिकेप्रकरणी अ‍ॅड गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल

मुंबई | खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिपण्णी केल्याप्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीवर मराठा आरक्षण प्रश्नी बोलताना अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. “अफजलाच्या औलादी आणि अफजलाच्या वृत्तीचे….. मी असल्या छत्रपती गाद्यांना मानत नाही” असे वादग्रस्त विधान गुणरत्न सदावर्ते यांनी केले होते. दरम्यान, सदावर्ते यांच्या या विधानानंतर मराठा समाजाने आक्रमक पवित्र घेतला होता.

अमर रामचंद्र पवार नावाच्या व्यक्तीने याच पार्श्वभूमीवर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. कलम 153(ब) अंतर्गत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदावर्ते यांच्या वादग्रस्त विधानानंतर सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्याने अमर रामचंद्र पवार यांनी कायदेशीर तक्रार दाखल केल्याचे म्हटले जात आहे. जाती-पातीमध्ये तेढ निर्माण करून दंगली भडकावणारी वादग्रस्त विधाने सदावर्ते यांनी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा एकेरी उल्लेख म्हणजे सकल मराठा समाजाचा अपमान आहे. त्यामुळे जाती-पातीमध्ये तेढ निर्माण करून दंगली भडकावणारी वादग्रस्त विधाने गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहेत. त्यामुळे गेल्या २ दिवसांपासून सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काहीच वेळात ‘फनी’ चक्रीवादळ २०० किमी प्रतितास वेगाने ओडिसा किनारपट्टीला धडकणार

News Desk

खड्ड्यामुळे दरदिवशी सहा जणांचा बळी

News Desk

Budget 2023 Live Updates: “7 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांना आयकरातून सूट”; निर्मला सीतारमण यांची घोषणा

Aprna