HW News Marathi
देश / विदेश

Budget 2023 Live Updates: “7 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांना आयकरातून सूट”; निर्मला सीतारमण यांची घोषणा

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या आज देशाचा अर्थसंकल्प (budget 2023) सादर करणार आहे. निर्मला सीतारमण या अर्थमंत्री झाल्यापासूनचा हा त्यांचा पाचवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारमण या आज (1 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहे. या अर्थसंकल्पात देशात काय स्वस्त आणि काय महाग होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रथेनुसार संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 31 जानेवारीपासून सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतात.  अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राज्यमंत्री डॉ. भागवत किशनराव कराड, राज्यमंत्री पंकज चौधरी आणि वित्त मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.

 

Budget 2023 Live Updates: 

 

 

  • 7 लाखापर्यंत उप्तन्नासाठी कर नाही
  • पारंपारिक कुशल कारागिरांना प्रोत्साहान देणार
  • पायाभूत सुविधांच्या खर्चात 33 टक्क्यांनी वाढ
  • पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटींची तरदूद
  • गरीब कैद्यांच्या जामिनासाठी आर्थिक मदत देणार
  • दीडशे मेडिकल कॉलेजांमध्ये 120 नर्सिंग कॉलेज होणार
  • आदिवासी बांधवांसाठी विशेष शाळा उभारणार
  • गटारांच्या मेनहोलमध्ये मानवी सफाई बंद करणार
  • गटारांच्या साफाईसाठी तांत्रिक जोड देणार
  • 40 वर्षापर्यंतच्या नागरिकांचे हेल्थ स्क्रीनिग होणार
  • लहान मुलांमधील रक्ताल्पतेचा आजार टाळण्याचे प्रयत्न
  • देशभरात 38 हजार 800 शिक्षकांची भरती होणार
  • शिक्षकांना प्रशिक्षण देऊन आणखी कुशल बनवणार
  • दुर्बल शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचे ध्येय
  • शिक्षणासोबतच अवांतर वाचनाची पुस्तके उपलब्ध होणार
  • वैद्यकीय उपकरणे बनवण्याला प्राधान्य देणार
  • मेडिकल कॉलेजमध्ये लॅब उभारणीला प्रोत्साहन देणार 
  • बांधावरच्या शेतकऱ्यांच्या हातांना डिजिटलचे बळ देणार  
  • मत्स्य व्यवसायासाठी मोठे पॅकेज देणार
  • कृषीपूरक योजनांना बळ देणार,
  • सहकाऱ्यातून समृद्धी साधण्यासाठी विशेष प्रयत्न करणार
  • भरड धान्यांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्सहान देणार
  • रोजगार निर्मितीचे ध्येय ठेवून ठोस उपक्रम, अन्नधान्याच्या उत्पन्नवाढीसाठी कसून प्रयत्न सुरू
  • कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी प्रयत्न
  • सबका साथ, सबका विकास या विकास तत्वाने पुढे जाऊ या.
  • देशातील सात पर्यटन क्षेत्रांच्या विकासाला प्राधान्य
  • पर्यटनाला चालणार देण्यासाठी मोठे निर्णय, राज्यांच्या समन्वयाने पर्यावरण, पर्यटनाबाबत पावले उचलणार
  • कोरोनासारख्या संकट काळात भारताची अर्थव्यवस्था मजबूत
  • 102 कोटी जनतेचे कोविड लसीकरण केले
  • ग्रामीण भाग – ग्रामीण भागातील महिलांना बचत गटाचे बळ मिळाले
  • गरीब जनतेला एक वर्ष मोफत अन्नधान्य देणार
  • युवकांना संधी देणे, बेरोजगारी कमी करण्यासाठी ठोस पावले
  • भारताने सर्वच क्षेत्रात यशस्वी वाटचाल केली आहे
  • लाभार्थींच्या खात्यात मदतीची थेट रक्कम दिली
  • यूपीआय, कोविन अॅपमुळे जगभरात भारताचे महत्व वाढले आहे.
  • निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली आहे

  • अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत दाखल
  • संसदेत ट्रकभर अर्थसंकल्पाच्या प्रती संसद भवनात दाखल झालेल्या आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात पोहोचले आहेत. तर केंद्रीय मंत्रिमंडळाची पूर्व अर्थसंकल्पीय बैठक सुरू असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन आधीच संसद भवनात पोहोचल्या आहेत.

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे.

Related posts

“आज बॅरिकेड हटवले उद्या तीन्ही कृषी कायदे हटवले जातील”-राहूल गांधी

News Desk

पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना जिल्ह्यात बॉम्बहल्ला १५ ठिकाणी बॉम्बहल्ला

News Desk

UK च्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची निवड

Aprna