HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ खडसेंवर अटकेची टांगती तलवार – अ‍ॅड. असीम सरोदे

पुणे | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. यावरुन अ‍ॅड. सरोदे यांनी भाष्य केले आहे. “भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा तपास हा योग्य दिशेने सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर आता स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता आहे” असं मत अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यातील न्यायालयात असीम सरोदे हे एकनाथ खडसे यांच्याविरोधात ही केस लढवत आहेत. या प्रकरणाची जी उपलब्ध कागदपत्रं आहेत, त्यानुसार प्रथमदर्शी खडसे हे यात पूर्णतः दोषी असल्याचं मतही अ‍ॅड. सरोदे यांनी व्यक्त केलं आहे.

पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी 13 तास कसून चौकशी केल्यानंर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली. ईडीची सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याआधी, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती.

काय आहे असीम सरोदे यांची पोस्ट?

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरील ईडी ची चौकशी योग्य दिशेने सुरू आहे. त्यांचे जावई गिरीश चौधरी यांची चौकशी व अटक झाली आहे. 7 वर्षांपूर्वी झालेल्या भोसरी भूखंड घोटाळा हे मनी लॉड्रिंग, बनावट कंपन्यांचा वापर करून लाखोंच्या रकमा फिरविणे, एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून स्वतःला फायदा होईल असे निर्णय घेणे व सरकारी कागदपत्रे बदलणे याचे अत्यंत क्लासिक उदाहरण असलेले प्रकरण आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अत्यंत मेहनतीने या केसबाबतची कागदपत्रे जमा केलीत, अभ्यासपूर्ण पद्धतीने त्यांनी आर्थिक घोटाळा कसा झाला ही प्रक्रिया शोधून काढली.एकनाथ खडसे यांच्या विरोधात ही केस वकील म्हणून चालवितांना मला अनेक अनुभव आले ते कधीतरी जरूर सांगेन.

या संपूर्ण प्रकरणात जस्टिस झोटिंग कमिटी नेमण्यात आली व त्यांनी एकनाथ खडसे यांना दोषी धरले नाही तर राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे निर्दोष आहेत अशी क्लीन चिट अक्षरशः पुण्यातील न्यायालयात दाखल केली. त्यावर अंजली दमानिया यांच्यातर्फे मी वकील म्हणून आक्षेप अर्ज दाखल केला. त्यावर युक्तिवाद सुद्धा झाला.नजीकच्या काळात एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना ईडी चौकशीसाठी बोलाविले जाऊ शकते व त्यांना अटक होण्याची भीती आहेच.

काय आहे भोसरी जमीन घोटाळा?

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘…खूप शॉपिंग करा’, अमृता फडणवीसांचा पुणेकरांना अनोखा सल्ला!

News Desk

’31 डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकार आणि 40 चोरांचे घोटाळे बाहेर आले असतील’- किरीट सोमय्या

News Desk

राजू शेट्टी यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झालीये, शेलारांची टिका 

News Desk