HW News Marathi
महाराष्ट्र

‘संज्या तू फटाके खाणारच आहेस पण…, निलेश राणेंचा राऊतांना इशारा

मुंबई | भाजप नेते निलेश राणे हे कायम आपल्या विरोधी पक्षावर आक्रमक टीका करत असतात. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अशीच एक जहरी टीका निलेश राणेंनी केली आहे. ‘संज्या तू फटाके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार’, अशी जहरी टीका केली निलेश राणेंनी केली आहे.

संज्या तू फटाके खाणारच आहेस

संजय राऊतांनी प्रसाद लाडांच्या टाकेवर प्रत्युत्तर केल्याने आता चांगलंच राजकारण पेटलं आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊतांना शिवसेना भवनात नेऊन फटके देऊ असा इशारा दिला आहे. “हे काय ऐकतोय मी की संज्या धमकी द्यायला लागलाय, संज्या तू फटाके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत,” असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, असं चिथावणीखोर वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर कालपासून संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेना नेते-कार्यकर्ते-पदाधिकारी लाड यांचा निषेध व्यक्त करत जशास तसं प्रत्युत्तर देत आहेत. आज सकाळी राऊतांना पत्रकार परिषदेत याचविषयी विचारलं असता, त्यांनी प्रसाद लाड यांना महत्त्व न देता त्यांना अनुल्लेखाने मारलं.वेळ आली तर सेना भवन फोडू असं प्रसाद लाड म्हणाले, आपण काय म्हणाल?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर संजय राऊत यांनी ‘आमचे शाखाप्रमुख बोलतील’ एवढ्याच तीन शब्दात लाड यांची इज्जत काढली आहे.

महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. (समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?, असं ट्विट करत लाड आणि नितेश राणे यांच्यावर राऊतांनी तुफानी टीका केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यामागचे चित्रा वाघ यांचे ‘हे’ कारण

News Desk

‘कोण करणार आमच्या घरांचे रक्षण?’, अंधेरीच्या पोलीस कुटुंबीयांचा सरकारला सवाल

Chetan Kirdat

सुप्रीम कोर्ट म्हणालं मराठा आरक्षण म्हणजे अल्ट्रा व्हायरस – गुणरत्न सदावर्ते

News Desk