HW News Marathi
महाराष्ट्र

मी कधी ठाकरेंचा फॅन नव्हतो, मात्र मुख्यमंत्र्यांचे आत्ताचे कार्य ह्रदयाला भिडणारे आहे – प्रशांत भूषण

मुंबई | शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्यार्या दिवशी केलेले भाषण संपूर्ण देशभरात नावाजले. ज्या पद्धतीने त्यांनी भाजपचा समाचार घेतला त्याची दाद सर्व स्तरांतून केली जात आहे. तशीच दाद सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंचे ते भाषण रिट्विट करत त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“मी कधी शिवसेनेचा, ठाकरेंचा असा काही फॅन नव्हतो. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतरच उद्धव ठाकरे यांनी जसे स्व:ला घडवले आणि ते आता जे कार्य करत आहेत ते ह्रदयाला भिडले”, असे ट्विट प्रशांत भूषण यांनी केले आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाचा कारभार आणि सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याविरुद्ध ट्विट करणारे विधिज्ञ प्रशांत भूषण यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. तसेच, त्यांना १ रुपयाचा दंड भरण्यासही सांगितले होते. आणि जर का हा दंड भरला नाही तर त्यांना ३ महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. तसेच, हा दंड भरण्यासाठी त्यांना १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तसेच, दंड न भरल्यास तुरुगंवासासोबत त्यांची प्रॅक्टिस ३ वर्षांसाठी बंद केली जाऊ शकते, असंही सांगण्यात आले होते. त्यांनी हा दंड देखील भरला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘एलजीबीटीक्यू’ वर्गासही महिला धोरणामध्ये स्थान! – ॲड.यशोमती ठाकूर

Aprna

मिलिंद एकबोटेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

News Desk

उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मुद्दा आता मुंबई उच्च न्यायालयात

News Desk