HW News Marathi
महाराष्ट्र

हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील साखरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, जिकडे तिकडे पाणीच पाणी…!

 शिवशंकर निरगुडे | दोन दिवसा विश्रांती नंतर आज पुन्हां पावसाने हजेरी लावली आहे. सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा खडकी धोतरा बन बरडा यासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस (Rains) पडला आहे. त्यामुळे सोयाबीन कापसू हळद हें सर्व पिके पाण्याखाली गेले आहेत.

याही वर्षी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यावर वरून राजाने अवकृपा दाखवली आहे. पेरणी झाल्याच्या सुरुवातीपासून म्हणजे एक महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे.सुरू दोन दिवसाचा विश्रांती नंतर आज सकाळ पासून पुन्हां पावसाने हजेरी लावली आहे पावसामुळे कोवळ्या पिकांना फटका परिणामी याचा उत्पादन वाढीवर परिणाम होणार हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा .बन बरडा केलसुला हिवरखेडा या सह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळलाय जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र बघायला मिळाले. साखरा आज ढगफुटी सदृश पाऊस पडला त्यामुळे पुराचे पाणी अनेकांच्या घरात शिरले होते काही ठिकाणी पिके सुद्धा पूर्ण पणे पाण्याखाली गेले आहेत साखरा येथील कापड दुकानात .किराणा दुकानात पाणी शिरले व येथील अनेकांच्या घरात देखिल पुराचे पाणी शिरले होते.

त्यामुळे गेल्या महीनाभरा पासून जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आत्ता आज पुन्हां पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आज सेनगाव तालुक्यातील भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्या भागातील त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थाकडून केली जात आहे सततधार पावसामुळे शेतकऱ्यांची कोळपनि फवारणी निंदन आदी कामे खोळंबली आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाण्यात रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेनेची ‘अबोली रिक्षा’

swarit

“…तर असा मंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही”- सदाभाऊ खोत

News Desk

आधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराच्या बाहेर काढून दाखवा – निलेश राणे

News Desk