HW News Marathi
महाराष्ट्र

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यानंतर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दारही होम क्वारंटाईन

बीड | राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्वतःहून होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज शनिवारी (१३ जून) लगेच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी देखील स्वतःच होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडेंसोबत समवेत सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांसोबत संपर्कात आल्याने बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे ५ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तातडीने बीड जिल्ह्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत.

धनंजय मुंडेंच्या व स्वीय सहाय्य्यकांच्या संपर्कात आलेल्या तब्बल १०८ पैकी ३४ जणांचे स्वॕब काल (१२ जून) रात्री अंबाजोगाई येथील कोवीड-19 तपासणी सेंटरला पाठवण्यात आले. या ३४ जणांचे रिपोर्ट आले असून त्यांपैकी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्या पॉझिटिव्ह व्यक्तीला आरोग्य प्रशासनाने पुढील उपचारासाठी ताब्यात घेतले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात ,मास्क घालून मंत्र्यांचे कामकाज सुरू…

News Desk

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna

‘ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच’ विरोधी पक्षाची टीका

Ruchita Chowdhary