HW News Marathi
महाराष्ट्र

दिवाळीनंतर ९वी ते १२वीचे वर्ग सुरु करणार, शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करणे गरजेचे

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (८ नोव्हेंबर) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. यावेळी अनेक महत्वाच्या विषयांवर त्यांनी भाष्य केले. शाळा दिवाळीनंतर सुरु करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. दिवाळीनंतर ९वी ते १२ वीचे वर्ग सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मात्र, शाळा पुन्हा सुरु करताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या कोरोना चाचण्या होणे गरजेचे आहे. गरज लागली तर मुलांचीही कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

तसेच, सगळ्यांसाठी रेल्वे कधी सुरु होणार यावरही त्यांनी भाष्य केले आहे. सगळ्यांसाठी ट्रेन सुरु व्हावी याकरता केंद्राशी बोलणे सुरु आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडून प्रतिसाद येत आहे. लवकरच ट्रेन सुरु करण्यासाठी परवानगी केंद्राकडून दिली जाईल याची खात्री आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे ? राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk

महाराष्ट्रातील जनतेने आज सरकारच्या मुस्काटात लगावली – राम कदम 

News Desk

“मी चुकीचं काही केलं नाही”…., अनिल परब यांचं स्पष्टीकरण

News Desk