HW News Marathi
महाराष्ट्र

‘राष्ट्रवादीत आल्यानंतर भाजपमधील गद्दार लोकं कळाली’ – एकनाथ खडसे

मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या अनेक नेत्यांसह गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझ्या मुलीच्या पराभवामागे महाजनच असल्याचं मला कालच समजलं, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अरे भाजपवाल्यांनी माझे असे हाल केले

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून जुंपली आहे. आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देण्याचा हा सिलसिला सुरू असतानाच एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्यावर नवा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली आहे. माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनच आहे. हे मला कालच समजलं, असं सांगतानाच मी भाजपमध्ये असलेल्यांना सांगतो की, अरे भाजपवाल्यांनी माझे असे हाल केले. तुम्ही काय त्यांची हाजीहाजी करता. राष्ट्रवादीत या, असं आवाहन खडसे यांनी भाजपमधील नेत्यांना केलं.नाथाभाऊला महाराष्ट्रात बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. पण नाथाभाऊ त्यांना भारी आहे. गिरीश महाजन यांना मी आवाहन करतो की, मी कमवलेली प्रॉपर्टी जर बेहिशोबी असेल तर तुम्हाला मी दान करून टाकेल. या उलट बीएचआर घोटाळ्यातून तुम्ही 10 कोटींची जमीन खरेदी केली आहे. माझ्याकडे उतारे आहेत, असा दावा खडसे यांनी केला.

गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ खडसे करत असलेले आरोप हा केविलवाणा प्रकार आहे. त्यांचं कुणी ऐकत नसल्याने ते वेड लागल्यासारखे वागत आहेत. एकनाथ खडसेंनी लेव्हल सोडली, खडसेंच्या सांगण्यावरुन माझ्यावर गुन्हे दाखल झाले. माझी चौकशी करावी. माझे वडील शिक्षक होते हे खरं आहे. पण एकनाथ खडसे यांच्या नावावर एवढे उतारे आले कुठून? खडसेंनी शेती करून 100 उतारे कसे ?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॅप्टन अमरिंदर सिंग लवकरच स्वतःचा नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत!

News Desk

एसटी महामंडळाचा ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव

News Desk

हिमाचल प्रदेशात दरड कोसळून ९ जणांचा मृत्यू, ३ जण जखमी

News Desk