HW News Marathi
Covid-19

राष्ट्रवादीनंतर शिवसेनासुद्धा आमदार-खासदारांचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार !काॅंग्रेस-भाजप अनुकरण करणार ?

मुंबई |  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशासमोर आर्थिक संकटही फार मोठे उभा राहिले आहे. या संकंटाचा सामना करताना देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येणार आहे. आता देशाची आणि राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता कालचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या खासदार आमदारांचे एक महिन्याचे वेतन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निधीला देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर  आता  शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे शिवसेना आपल्या सर्व आमदार आणि खासदारांच्या एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहे.शिवसेना आणि राषट्रवादीनंतर आता काॅंग्रेस आणि भाजपपण हेचं अनुकरण करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे. “कोरोना संसर्गावर मात करण्यास मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे शर्थीने प्रयत्न करीत आहेत. शेतकरी, कामगार, गोरगरिबांच्या मदतीसाठी शिवसेनेचे विधानसभा, विधान परिषदेचे सर्व आमदार आणि लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व खासदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत आहेत”, असं सुभाष देसाई यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद

News Desk

महाराष्ट्रातही सर्वांनी कोरोनाची लस मोफतच ! ही घोषणा करत मालिकांची भाजपवर टीका

News Desk

राज्यात २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू, सहा लाख कामगार रुजू

News Desk