HW News Marathi
देश / विदेश

पवारांनंतर खासदार संभाजीराजे घेणार राज ठाकरेंची भेट !

मुंबई | मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला त्यानंतर हे आरक्षण कसं मिळवतां येईल यासाठी महाराष्ट्रात खलबतं सुरू आहेत.खासदार संभाजीराजे छत्रपती हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.अनेक संघटना ,मराठा नेते ,कार्यकर्ते यांच्या ते भेटीगाठी घेत आहेत.आज त्यांनी मुंबई मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर आता ते दुपारी ३ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी जाणार आहेत.त्यामुळे राज ठाकरे-संभाजीराजे भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे महत्वाचं असेल .

शरद पवार-संभाजीराजे भेटीमध्ये काय झालं ?

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर ते पुन्हा मिळवण्यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजप खासदार संभाजीराजे हे देखील आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे यांनी आज (२७ मे) सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी संभाजीराजे आणि शरद पवार यांच्यात १५ मिनिटे चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही भेट सकारात्मक झाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. तसेच, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे नारायण राणे या सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा”, अशी विनंती देखील संभाजीराजे यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सीएए’, ‘एनआरसी’विरोधात काँग्रेस आणि अर्बन नक्षल अफवा पसरवत आहेत !

News Desk

कोण आहे स्टीफन हॉकिंग

News Desk

“हिंदू जन आक्रोश मोर्चा मोदी आणि शाहांच्या भूमिकेविरूद्ध”, संजय राऊतांचा बोचरी टीका

Aprna