HW News Marathi
देश / विदेश

संभाजीराजे आणि शरद पवारांमध्ये १५ मिनिटे चर्चा ! भेटीत नेमके काय घडले ?

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर ते पुन्हा मिळवण्यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजप खासदार संभाजीराजे हे देखील आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे यांनी आज (२७ मे) सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी संभाजीराजे आणि शरद पवार यांच्यात १५ मिनिटे चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही भेट सकारात्मक झाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. तसेच, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे नारायण राणे या सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा”, अशी विनंती देखील संभाजीराजे यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, “गेले ३ ते ४ दिवस मी राज्याच्या दौरा केला. आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाज किती अस्वस्थ, दु:खी आहे हे मी शरद पवारांना सांगितले. मी सर्व परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. मराठा समाजावर अन्याय होत आहे. त्यामळे मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह, विरोधी पक्षनेते तसेच भाजपचे नेते नारायण राणे अशा सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. आता सर्व नेत्यांनी मराठा समजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे”, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केल्याचे संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले आहे.

मी उद्या मुंबईत पत्रकार परिषद घेईन ! | संभाजीराजे

संभाजीराजे यावेळी बोलताना पुढे म्हणाले कि, “मी शरद पवार यांना सांगितले कि, मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे. याबाबत शरद पवारांनी देखील सकारात्मकता दाखवली आहे. मी उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. या दोन्ही नेत्यांसोबतच्या भेटीनंतर मी उद्या संध्याकाळी मुंबईत पत्रकार परिषद घेईन”, असे संभाजीराजे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आत्महत्येवर झटपट उपाय अशक्य-सर्वोच्च न्यायालय

News Desk

नासाच्या कॅलेंडरसाठी भारतीय मुलांनी रेखाटलेल्या चित्रांची निवड

News Desk

ISRO अंतराळात १९ सॅटेलाईट लॉन्च करणार, आज २०२१ मधील पहिलं अंतराळ अभियान

News Desk