HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

शिवभोजन थाळीच्या शर्यतीत आता दीनदयाळ थाळी

पंढरपूर | सत्तेतील सरकार जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी कोणती गोष्ट करतील याचा काही नेम नाही. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने १० रुपयांची शिवभोजन थाळी सुरू केली होती आणि आता त्याचे प्रत्युत्तर म्हणून भाजप ने दीनदयाळ थाळी सुरु केली आहे. पंढपुरातील काही महिलांनी श्री महिला उद्योग या संस्थेची स्थापना केली होती. सुरुवातीला या संस्थेच्या अंतर्गत या महिला शेंगदाणा लाडू, पापड आणि इतर खाद्यपदार्थ बनवून विकत असत. याच महिलांना सोबत घेत भाजपने दीनदयाळ थाळीची सुरुवात केली. श्री विठ्ठल मंदिराजवळील इंदिरा गांधी भाजी मार्केटजवळ ही योजना आजपासून (१२ फेब्रुवारी) सुरु झाली.

या थाळीची किंमत ३० रुपये असून थाळीत ३ चपाती, १ भाताची मुद , १ वाटी भाजी, १ वाटी आमटी, १ वाटी ताक, लिंबू फोड, शेंग चटणी, लोणचे, पापड असे १० पदार्थ असणार आहेत. दुपारी १२ ते १ या एक तासाच्या वेळेतच ही थाळी सर्वांना दिली जात आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधत राज्याचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते या थाळीची सुरुवात करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांच्या पुढाकाराने ही थाळी सुरू करण्यात आली आहे. आता शिवभोजन थाळीला दीलदयाळ थाळी टक्कर देणार का हे पाहायला हवे. खरोखरीच जनतेची भूक भागवणे हा हेतू आहे की एकमेकांवर कुरघोडी करणे याचा निकाल तर काळानूसार कळेलच.

शिवभोजन थाळीचा लाभार्थ्यांना खरोखरीच लाभ झाला

गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी सुरु झाली होती. ११ फेब्रुवारी २०२० ला  या योजनेच्या अंमलबजावणीला  १७ दिवस पुर्ण झाले. या १७ दिवसांच्या काळात राज्यात २ लाख ३३ हजार ७३८ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या “शिवभोजन योजने”ला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रजासत्ताकदिनी योजना सुरु झाल्यानंतर पहिल्या आठ  दिवसांच्या कालावधीतच  म्हणजे २ फेब्रुवारी २०२० पर्यंतच शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या १ लाखांहून अधिक (१ लाख ५ हजार ८८७)  झाली होती. आता ११ फेब्रुवारीपर्यंत त्यात आणखी १ लाखांहून अधिक लाभार्थ्यांची वाढ झाली आहे.

Related posts

“राम्या पोरी पळव…पंकु चिक्की घे…”, राष्ट्रवादीची जोरदार टीका

News Desk

#LokSabhaElections2019 : निवडणुकांच्या तारखांवरून वाद निर्माण करणाऱ्यांना ओवेसींनी सुनावले

News Desk

मुंबईत अटलजींचे स्मारक उभारण्याचा निर्धार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk